तोंडात पाणी भरून कपड्यांवर फवारलं, मग करू लागला प्रेस; VIDEO पाहून लोक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:58 IST2022-07-11T15:57:19+5:302022-07-11T15:58:27+5:30

या व्यक्तीच्या शेजारीच एक जुन्या काळातील कोळशाची प्रेसही दिसत आहे. यावरून संबंधित व्यक्ती प्रेसवालाच असल्याचे स्पष्ट होते.

Old Man Sprinkle Water From Mouth While Ironing Clothes, People angry Video went viral | तोंडात पाणी भरून कपड्यांवर फवारलं, मग करू लागला प्रेस; VIDEO पाहून लोक भडकले

तोंडात पाणी भरून कपड्यांवर फवारलं, मग करू लागला प्रेस; VIDEO पाहून लोक भडकले

काही दिवसांपूर्वी पाणीपुरी विकणाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. यात, पाणीपुरी विकणारी व्यक्ती टॉयलेटच्या पाण्याचा वापर करत असल्याचे दिसत होते. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. यातच आता, आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती कपड्यांना प्रेस करण्यापूर्वी, आपल्या तोंडात पाणी भरून त्या कपड्यांवर फवारताना दिसत आहे.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित वृद्ध व्यक्ती कपड्यांना प्रेस करण्यापूर्वी, एका भांड्याने तोंडात पाणी घेऊन त्या कपड्यांवर ते फवारताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, ही व्यक्ती वारंवार ही कृती करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्यक्तीच्या शेजारीच पाणी शिंपडण्यासाठी एक बाटलीही दिसत आहे. 

या व्यक्तीच्या शेजारीच एक जुन्या काळातील कोळशाची प्रेसही दिसत आहे. यावरून संबंधित व्यक्ती प्रेसवालाच असल्याचे स्पष्ट होते. मात्र, हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आणि कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच, लोक भडकले आहेत. 

हा व्हिडिओ बघितलेल्या एका व्यक्तीने  लिहिले आहे, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर, येथून कपडे प्रेस करून नेणारे लोक बेशुद्धच पडतील. तर एका व्यक्तीने संबंधित प्रेसवाल्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


 

Web Title: Old Man Sprinkle Water From Mouth While Ironing Clothes, People angry Video went viral