चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:51 IST2021-10-05T15:51:02+5:302021-10-05T15:51:15+5:30

व्हायरल होत असलेले आजोबा तर चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.

old man singing classical song on street video goes viral | चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल

चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल

कोणामध्ये काय प्रतिभा दडलेली आहे, हे सांगता येत नाही असं म्हणतात. तर प्रत्येक माणसामध्ये एखादीतरी कला दडलेली असतेच. सध्या व्हायरल होत असलेले आजोबा तर चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आजोबा कसलाही बडेजाव न मिरवता उभं राहून ते गाणं गात आहेत. विशेष म्हणजे ते गात असताना बाकीचे लोक आवडीने शातंपणे ऐकत आहेत. काही लोक मध्येच दाद देताना दिसतायत. ते शास्त्रीय संगीत गात आहेत. कसलाही संकोच न करता ते गात आहेत. विशेष म्हणजे गाणं गाताना ते कुठेही अडथळत नाहीयेत. त्यांची हीच खासियत लोकांना आवडली आहे.

नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला आहे.  हा व्हिडीओ तुम्हाला @Chopsyturvey या ट्विटर अकाऊंटवर पाहायला मिळेल.

Web Title: old man singing classical song on street video goes viral