आजी-आजोबाच्या विदेशी बॉल डान्सची सोशल मीडिया रंगली चर्चा, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 13:32 IST2018-08-16T13:30:26+5:302018-08-16T13:32:19+5:30

आता एका आजींचा डान्स सोशल मीडियात व्हायरल झाला असून या डान्सने आजीने सर्वांना तोंडात बोटं घालायला भाग पाडलं आहे. 

Old Elderly Indian Couple Perfect Ball Dance Goes Viral | आजी-आजोबाच्या विदेशी बॉल डान्सची सोशल मीडिया रंगली चर्चा, व्हिडीओ व्हायरल!

आजी-आजोबाच्या विदेशी बॉल डान्सची सोशल मीडिया रंगली चर्चा, व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी भोपाळमधील एका व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना डान्सिंग अंकल या नावानेही बोलवले जाऊ लागले. आता एका आजींचा डान्स सोशल मीडियात व्हायरल झाला असून या डान्सने आजीने सर्वांना तोंडात बोटं घालायला भाग पाडलं आहे. 

या व्हिडीओत केवळ आजीच नाही तर एक आजीसोबत एक आजोबाही आहेत. दोघेही एका पार्टीमध्ये हा डान्स करताना दिसत आहे. बरं या दोघांचं वय हा तर आश्चर्याचा मुद्दा आहेच सोबतच या दोघांनी साधासुधा डान्स नाही तर चक्क बॉल डान्स केलाय. हा डान्स पाहून आपोआप चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आल्याशिवाय राहत नाही. 

फेसबुकवर हा व्हिडीओ आदर्श हेगडे नावाच्या यूजरने पोस्ट केलाय. आदर्श हा कर्नाटकात राहणारा आहे. आजी-आजोबांची वेशभूषा पाहूनही हेही तेथीलच असल्याचे दिसते. आजीने पारंपारिक पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर आजोबा फॉर्मल ड्रेसमध्ये आहेत. 

खास बाब म्हणजे या व्हिडीओत आजूबाजूला लहान मुले आणि तरुण मंडळीही डान्स करताना दिसत आहेत. पण या आजी-आजोबांची सर त्यांच्या डान्सला नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ १८ हजार वेळा शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून जीवन सुंदर आहे, त्यांचा आनंद घ्या इतकंच म्हणावं वाटतं. 

Web Title: Old Elderly Indian Couple Perfect Ball Dance Goes Viral