बापरे! ट्रेनमध्ये चहा पिताय? हा व्हिडीओ बघा, पुढच्यावेळी विचार कराल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:36 IST2025-01-24T16:26:27+5:302025-01-24T16:36:20+5:30

Viral Video: आपण ट्रेनने प्रवास करत असताना नेहमी चहा घेत असतो.

Oh my God! Drinking tea on the train? Watch this video, you will never drink tea again | बापरे! ट्रेनमध्ये चहा पिताय? हा व्हिडीओ बघा, पुढच्यावेळी विचार कराल...

बापरे! ट्रेनमध्ये चहा पिताय? हा व्हिडीओ बघा, पुढच्यावेळी विचार कराल...

Viral Video : आपण रेल्वेने सगळे प्रवास करत असतो. रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेगाडीत चहा, वडापाव विकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रेल्वेतील चहा विकणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. 

हा व्यक्ती चहा बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर ट्रेनमधील चहा कधीच घेणार नाही. व्हिडिओमध्ये, हिटर रॉड वापरून पाणी गरम केला जात आहे, अशा पद्धतीनेच ते चहा बनवत असल्याचे दिसत आहे.  

चहा बनवण्याची ही पद्धत चुकीची आहे. या चहासाठी पाणीही रेल्वेतील वापरल्याचा दावा करण्यात येत आहे. असा चहा पिऊन अनेकजण आजारी पडू शकतात.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


टॉयलेटमध्ये भांडी धुतानाचा  व्हायरल

रेल्वेत काही विक्रेते, ज्यांना सुरक्षितता आणि स्वच्छतेशी काहीही देणेघेणे नाही, ते या प्रवाशांच्या विश्वासाचा फायदा घेतात. अलिकडेच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

yt_ayubvlogger23 नावाच्या एका वापरकर्त्यांना असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेल्वेच्या टॉयलेटमध्ये बसून चहाचे डबे स्वच्छ करत असल्याचे दिसत आहे. हे टॉयलेट एका ट्रेनचे आहे आणि व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती टॉयलेटच्या जेट स्प्रेने कंटेनर साफ करत आहे. 


Web Title: Oh my God! Drinking tea on the train? Watch this video, you will never drink tea again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.