तुम्ही सिंगल आहात का? आता तुम्ही म्हणाल मध्येच काय विचारताय? अहो, असं विचारण्यासाठी कारणही तसचं आहे. एक महिला आहे. तिने आपलं सिंगलहुड वाढविण्यासाठी एक इन्स्टाग्राम पेज तयार केलं आहे. या पेजचं नाव ठेवलं आहे 'Not Engaged'. या पेजवर आपलं सिंगलहुड दर्शवणारे अनेक फोटो ती शेअर करत असते. पण तुम्हाला असं वाटेल की, अगदीच दुःखी, लोनली फोटो शेअर करत असेल. पण तसं नाही. तिच्या फोटोमधून ती सिंगल असण्याचे किती फायदे आहेत आणि त्यामुळे तुम्ही किती आनंदी राहू शकता हेच समजतं. Mary McCarthy या अकाउंटची क्रिएटर आहे. 

1 लाख 45 हजार लोक करतात फॉलो

सिंगल लोकांचं दुःख कोणीच समजू शकत नाही असं सांगितलं जातं. पण खरंतर सिंगल राहण्याचे फायदेही तेवढेच आहेत. त्यामुळेच तर या पेजचे जवळपास 1 लाख 45 हजार फॉलोअर्स आहेत. 

एन्गेजमेन्ट रिंग नसलेले हात 

इन्स्टाग्राम पेजवरील प्रत्येक फोटोमध्ये पेज क्रिएटर आपल्या एन्गेजमेंट नसलेल्या हाताचा फोटो पोस्ट करत असते. 

रिंग नसलेल्या हाताचा फोटो पोस्ट का करते? 

सध्याचं युग हे सिंगलहुडचं आहे. जे सिंगल आहेत, ते कूल आहेत. पण जे रिलेशनशिपमध्ये आहेत, ते हैराण आहेत, असं सिंगल लोकांचं म्हणणं आहे. महिला आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून हाच संदेश देत आहे. 

महिला आपल्या पेजवरून अनेक फोटो पोस्ट करत असते. जे सिंगलहुड दर्शविणारे असतात. या पेजचे अनेक फॉलोवर्सही आहेत. 

Web Title: Not engaged instagram page is for single people photos are viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.