AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:53 IST2025-10-12T16:37:04+5:302025-10-12T16:53:13+5:30
सध्या एआयचा वापर करुन अनेकजण भन्नाट काहीही बनवत आहे, सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. पण या तरुणाने एआयचा वापर नाहीतर स्वत:ची क्रिएटिव्हिटी वापरुन एक व्हिडीओ बनवला आहे.

AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
डिजिटल युगात रोज एक नवीन क्रांती होत आहे. सध्या जगभरात एआयची मोठी क्रांती झाली आहे. एआयमुळे अनेक जण रोज नव नवीन क्रिएटिव्हिटी करत आहेत. पण, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील तरुणाने एआयलाही मागे टाकले आहे. बिहारमधील एका तरुणाने आपल्या कल्पकतेचा वापर करून असा पराक्रम केला की लोक हसून हसून म्हणाले, 'भाऊ, त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेलाही मागे टाकले आहे'. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
व्हायरल व्हिडिओमध्ये बिहारमधील एका तरुणाने हातात जीन्सची जोडी धरली आहे. त्याने जीन्स अशा प्रकारे जोडली आहे की पाहणाऱ्यांना तो दोन पायांनी चालत असल्याचे दिसते. या व्हिडीओवर अनेकांना हसू आवरत नाही.
व्हिडिओचा पुढचा भाग वेगळा दिसतो. तो तरुण मागे वळून सांगतो की हे सर्व त्याच्या शिवणकाम आणि डिझाइनच्या कौशल्यामुळे झाले आहे. त्याने त्याचा कुर्ता अर्ध्या भागात कापला आहे, यामुळे त्याच्या शरीराचा वरचा अर्धा भाग गायब झाल्यासारखे दिसते.
भावाने एआयलाही मागे टाकले
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "भावाने एआयलाही मागे टाकले. एआयला धक्का बसला, बिहारींनी धमाकेदार कामगिरी केली!" याचा अर्थ, "भावाने एआयलाही मागे टाकले." सोशल मीडियावरील लोक अशा कमेंट करत आहेत.