झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
By संतोष कनमुसे | Updated: October 11, 2025 13:25 IST2025-10-11T13:06:06+5:302025-10-11T13:25:26+5:30
छत्तीसगडमधील खैरागढ जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक वृद्ध महिला तोडलेल्या झाडाला धरून रडत असल्याचे दिसत आहे.

झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
आपण एखादे झाड लावतो, त्या झाडाचा सांभाळ काळजाच्या तुकड्यासारखा करतो. ते झाड आपल्या आयुष्यातील एक भाग होऊन जाते. पण, काही कारणाने ते झाड कोसळते किंवा तोडावे लागते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. आपण निसर्गावर प्रेम आणि भावनेशी जोडत असतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी झाड तोडल्यामुळे भावूक झाल्याचे दिसत आहे. निसर्गावर प्रेम करणारी शेवटची पिढी असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
हा व्हिडीओ छत्तीसगडमधील आहे. लोक या व्हिडिओला निसर्गावरील प्रेम आणि भावनेशी जोडत आहेत. एका वृद्ध आजीने २० वर्षांपूर्वी पिंपळाचे झाड लावले होते. तिने ते स्वतःच्या मुलासारखे सांभाळले आणि त्या झाडाची काळजी घेतली. जेव्हा ते तोडण्यात आले तेव्हा त्या आजी भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
झाड तोडताना पाहून आजीला रडू कोसळले
छत्तीसगडच्या खैरागड जिल्ह्यातील सारगोंडी गावात ही घटना घडली. एक वृद्ध महिला कापलेल्या पिंपळाच्या झाडाला धरून रडत असल्याचे दिसतंय. त्या वृद्ध महिलेने २० वर्षांपूर्वी स्वतःच्या हातांनी पिंपळाचे झाड लावले होते. ती दररोज त्याला पाणी घालत होती आणि त्याची पूजा करत होती. पण जेव्हा पिंपळाचे झाड तोडण्यात आले तेव्हा ती खूप रडू शकली नाही. महिलेला रडताना पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला.
गावकऱ्यांनी सांगितली माहिती
वृद्ध आजीने लावलेले झाड सरकारी जागेवर होते. गावकरी दररोज त्याची पूजा करायचे. खैरागड येथील रहिवासी इम्रान मेमन आणि त्यांचा सहकारी प्रकाश कोसारे यांनी हे झाड तोडल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी ग्रामस्थ प्रमोद पटेल यांनी खैरागड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम २९८ आणि ३(५) अंतर्गत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी इम्रान मेमनला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान इम्रानने सरकारी जागेवरील पिंपळाचे झाड तोडल्याचे कबूल केले.
Elderly Indian woman breaks down as tree she nurtured for 20 years is cut
Courtesy: Social Media#Chhattisgarhpic.twitter.com/E0lAYQaJlU— WION (@WIONews) October 11, 2025