Video: भिकाऱ्याची श्रीमंती पाहा; ना EMI ना लोन, ऑन कॅश विकत घेतला iPhone 16 ProMax
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:15 IST2025-01-21T18:14:03+5:302025-01-21T18:15:44+5:30
भीक मागणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने दीड लाखाचा फोन घेतल्याचे पाहून नेटकरी आवाक् झाले आहेत. पाहा Video...

Video: भिकाऱ्याची श्रीमंती पाहा; ना EMI ना लोन, ऑन कॅश विकत घेतला iPhone 16 ProMax
Viral Video : भारतात Apple कंपनीच्या iPhone मोबाईलची खूप क्रेझ आहे. पूर्वी फक्त श्रीमंतांच्या हातात दिसणारा हा फोन, आता सर्वसामान्यांच्या हातातही दिसतोय. विशेष म्हणजे, गरीब व्यक्तीही हा फोन खरेदी करतोय. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यात कचरा वेचणारी महिला आणि भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे iPhone पाहून नेटकरी चकीत झाले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
राजस्थानच्या अजमेरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना हसू आवरेना. याचे कारण म्हणजे, व्हिडिओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती बाजारात भीक मागताना दिसतोय. विशेष म्हणजे, त्याच्याजवळ iPhone 16 Pro Max मोबाईल आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंय. या भिकाऱ्याकडे चक्क Apple चा सर्वात लेटेस्ट फोन आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, हा फोन त्याने ऑन कॅश 1.5 लाख रुपये देऊन विकत घेतलाय.
Apple चा iPhone 16 Pro Max गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1,44,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. हा Apple चा सर्वात लेटेस्ट फोन आहे. एका भिकाऱ्याच्या हातात इतका महागडा फोन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ रोहित नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भिकाऱ्याला एवढा महागडा फोन कुठून आणला, हे विचारतो. यार तो भिकारी सांगतो की, त्याने भिक मागून हा फोन खरेदी केलाय. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही जो फोन ऑन कॅश घेत नाही, तो फोन या भिकाऱ्याने ऑन कॅश घेतल्यामुळे नेटकरी आवाक् झाले आहेत.