लय भारी! लग्नाचा खर्च टाळून 'या' जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:42 PM2020-06-24T13:42:34+5:302020-06-24T13:49:38+5:30

साध्या पद्धतीने लग्न करून त्याच पैश्यात या जोडप्याने ५० बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान केले आहेत.

Newly weds couple who donate 50 beds and oxygen cylinders to covid centre | लय भारी! लग्नाचा खर्च टाळून 'या' जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर

लय भारी! लग्नाचा खर्च टाळून 'या' जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर

Next

कोरोनाकाळात माणूसकीची सुद्धा परिक्षा सुरू आहे. कोरोनाच्या माहामारीत कधीही न ओढावलेल्या प्रसंगाचा सामना लोकांना करावा लागला. अनेक कोरोना वॉरिअर्सनी जीवाची पर्वा न करता देवदूताप्रमाणे गरजवंतांना मदतीचा  हात दिला. समाजातील सधन लोकांपैकी बरेचजण कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पैसै, खाद्यपदार्थ, रेशन, कपडे रुग्णालयांना बेड पुरवणं जमेल तशी मदत केली जात आहे. 

मुंबईतील वसईच्या एका जोडप्याने लग्नाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. या जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी ५० बेड दिले आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार  २८ वर्षीय एरिक एंटोन लोबो आणि २७ वर्षीय मर्लिन यांनी वसईच्या नंदाखास गावात लग्न केले. साध्या पद्धतीने लग्न करून त्याच पैश्यात या जोडप्याने ५० बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान केले आहेत. सतपाला गावातील कोविड 19 सेंटरमध्ये बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान करण्यात आले आहेत. 

shadi

या लग्नासाठी फक्त २२ लोक उपस्थित होते. लोबो यांनी सांगितले की, ''ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नात जवळपास २००० लोक येतात. तसंच वाईन पार्टी, मेजवानीशिवाय लग्न अपूर्ण आहे. या सगळ्यासाठी खूप खर्च लागतो. म्हणून आम्ही वेगळ्या प्रकारे लग्न करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून खर्च वाचेल.'' 

पुढे ते म्हणाले, ''पालघरमध्ये १५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा स्थितीत आपण काय करू शकतो. असा विचार मनात आल्यानंतर आम्हाला ही कल्पना सुचली. स्थानिक लोकांसाठी आम्हाला काहीतरी करायचे होते. म्हणून बेड दान करण्याचं आम्ही ठरवलं. या कामात आम्हाला स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी मदत केली. '' लग्नानंतर हे जोडपं कोविड सेंटरमध्ये गेलं. त्याठिकाणी बेड्स, गाद्या आणि उश्या सुद्धा दान केल्या आहेत. या दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. 

पैसा ही पैसा होगा! आयुर्वेदिक औषध लॉन्च केल्या केल्या नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

मशरूमच्या आकाराचा ढग दिसला, लोकांना वाटलं अणुबॉम्ब फुटला

Web Title: Newly weds couple who donate 50 beds and oxygen cylinders to covid centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.