New Porsche parking hit in wall and cars video goes viral | VIDEO : नवीन Porsche कार करत होता पार्क, नंतर जे झालं ते पाहून चक्रावून जाल!

VIDEO : नवीन Porsche कार करत होता पार्क, नंतर जे झालं ते पाहून चक्रावून जाल!

Porsche कार खरेदी करणं मोठ्या-मोठ्यांचं स्वप्न असतं. कोट्यवधी रूपयांची ही कार अनेकांचं स्वप्नही असतं आणि स्टेटसही. या कारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती Porsche कार पार्क करत होती. अशात अचानक त्याने कार वेगाने रेस केली आणि कार आउट ऑफ कंट्रोल होऊन कारचे बारा वाजले.

Andy नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. टाइम्स ऑफ इंडियानुसार, Manninggtree, Essex यूकेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत पोर्शे कार हळूहळू पुढे जात आहे. कार पूर्णपणे नवीन दिसत आहे. अचानक कार वेगाने पुढे जाते आणि थेट समोर उभी असलेल्या ब्लॅक एसयूव्हीवर जाऊन आदळते. त्यानंतर भींतीच्या खाली पार्क असलेल्या कारवर जाऊन आदळते. (बोंबला! व्हिडीओ बनवता बनवता ठोकली वडिलांची २५ कोटींची कार, मग सांगितलं कारण...)

मीडिया रिपोर्ट्सनुसार या व्यक्तीने ही कार ५ दिवसांआधी खरेदी केली होती. सुदैवाने कारमधील व्यक्तीला काहीही झालं नाही. पण इतक्या महागड्या कारचं नुकसान होणं ही सुद्धा जखमच आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New Porsche parking hit in wall and cars video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.