बोंबला! व्हिडीओ बनवता बनवता ठोकली वडिलांची २५ कोटींची कार, मग सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 10:39 AM2020-11-24T10:39:37+5:302020-11-24T10:41:26+5:30

कारची टक्कर इतकी जोरदार होती की, कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने यूट्यूबर Gauge आणि त्याच्या मित्राला फार काही झालं नाही.

17 year old youtuber crashes dads pagani car worth 25 crore while filming | बोंबला! व्हिडीओ बनवता बनवता ठोकली वडिलांची २५ कोटींची कार, मग सांगितलं कारण...

बोंबला! व्हिडीओ बनवता बनवता ठोकली वडिलांची २५ कोटींची कार, मग सांगितलं कारण...

googlenewsNext

या १७ वर्षांच्या यूट्यूबरचं नाव आहे Gauge Gillian. त्याचे वडील बिझनेसमन असून त्यांना महागड्या स्पोर्ट्स कारचीही आवड आहे. मुलगा नेहमीच वडिलांच्या लक्झरी कार्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. याच कार कलेक्शनपैकी एक २५ कोटी रूपयांची Pagani Huayra Roadster कार चालवत तो मित्रासोबत यूट्यूब व्हिडीओ शेअर करत होता. अचानक कारवरील कंट्रोल सूटला आणि कार झाडावर जाऊन आदळली.

कारची टक्कर इतकी जोरदार होती की, कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने यूट्यूबर Gauge आणि त्याच्या मित्राला फार काही झालं नाही. Gauge चा हात फ्रॅक्चर झाला. ज्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला.  याबाबत त्याने एक व्हिडीओ तयार केला असून हा अपघात कसा झाला हे त्याने सांगितले आहे.

या ८ मिनिटे २० सेकंदाच्या व्हिडीओत Gauge ने सांगितले की, 'ती एक शानदार आणि पॉवरफुल कार आहे. चूक माझी होती. कार माझ्या कंट्रोलमधून बाहेर गेली आणि माझा मित्र जॅक अपघाताचा शिकार झाला. आम्ही दोघेही नशीबवान होतो की, आम्ही वाचलो. या घटनेमुळे माझे वडील आधी रागात होते. कारण ते कारचे शौकीन आहेत. पण त्यांना आनंद आहे की, त्यांचा मुलगा सुरक्षित आहे. कारण कार पुन्हा खरेदी केली जाऊ शकते. पण...!

सध्या जखमेमुळे Gauge सोशल मीडियापासून दूर आहे. आणि हो तुम्हीही चालवताना व्हिडीओ शूट करत असाल तर हे तुमच्यासाठी मोठं उदाहरण आहे. कारण सर्वांचं नशीब चांगलं असेलच असं नाही.

काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली होती. हा व्हिडीओ २४ ऑक्टोबरला यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. या व्यक्तीने त्याची १५०,००० डॉलरची मर्सिडीज GT 63s कार जाळली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 
 

Web Title: 17 year old youtuber crashes dads pagani car worth 25 crore while filming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.