या पेंटिंगमध्ये दडल्या आहेत ४० लोकप्रिय जाहिराती, शोधाल तरच सापडतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 16:47 IST2019-06-03T16:31:49+5:302019-06-03T16:47:50+5:30

बालपणाला उजाळा द्यायचा असेल तर या पेंटींगमध्ये तुम्ही जाहिराती शोधू शकता.

Netizens struggle to find all 40 Indian ads hidden in this painting | या पेंटिंगमध्ये दडल्या आहेत ४० लोकप्रिय जाहिराती, शोधाल तरच सापडतील!

या पेंटिंगमध्ये दडल्या आहेत ४० लोकप्रिय जाहिराती, शोधाल तरच सापडतील!

वैभव विशाल नावाच्या एका व्यक्तीने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका पेंटिंगचा फोटो शेअर केला असून त्यात ४० प्रसिद्ध भारतीय जाहिराती असल्याच म्हटलं आहे. ज्यांना आठवणींवर प्रेम आहे अशांसाठी ही एक प्रेमळ आणि छोटी ट्रिप असेल. त्यांनी या पेंटिंगमधील जाहिराती शोधण्यास सांगितलं आहे.


सोशल मीडिया यूजर्स आता या पेंटिंगच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. जर तुम्हालाही काही तुमच्या आवडीच्या जाहिराती दिसत असतील तर शोधा. बघा तुम्हाला दिसतं का यात तुमचं बालपण!





या व्यक्तीने ट्विट करून हे सांगितलं आहे की, ही पेंटींग संदीप सावंत, हितेश शाह, अरूण उडमले, सुबोध आणि पवन यांनी मिळून तयार केलं आहे.

Web Title: Netizens struggle to find all 40 Indian ads hidden in this painting