Negligence of hospital : कोरोना निगेटिव्ह असूनही खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला; उपचाराच्या नावावर २ लााखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 17:14 IST2021-04-25T17:08:51+5:302021-04-25T17:14:10+5:30
Negligence of hospital Corona reported positive : सिटी स्कॅनच्या अहवालाच्या आधारे येथील खासगी रुग्णालयात एका रूग्णाला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल करण्यात आले.

Negligence of hospital : कोरोना निगेटिव्ह असूनही खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला; उपचाराच्या नावावर २ लााखांची मागणी
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात कोरोना रुग्णांशी संबंधित रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणादरम्यान, सर्वच लोक हॉस्पिटल आणि तिथे काम करत असलेल्या डॉक्टरांवर विसंबून आहेत, परंतु त्यांचे दुर्लक्ष कधीकधी अडचणीचे कारण बनते. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. सिटी स्कॅनच्या अहवालाच्या आधारे येथील खासगी रुग्णालयात एका रूग्णाला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल करण्यात आले.
उपचाराच्या नावाखाली कुटुंबीयांनी सुमारे 2 लाख रुपयांचे बिलदेखील दिले, परंतु नंतर रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मग कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना खूप सुनवले. त्यानंतर यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला.
७ दिवसात १७ लाख खर्च करूनही जोडपं वाचलं नाही; दीड वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलानं दिला मुखाग्नी
जबलपूरमधील कोरोना संसर्गाने सर्वत्र त्याचे हायपाय पसरले आहेत. रूग्णांची संख्या इतकी जास्त आहे की रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नाहीत. रुग्णालये, विशेषत: खासगी रुग्णालये याचा पूर्ण फायदा घेत आहेत. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ
दरम्यान निरोगी व्यक्तीला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. केवळ सिटी स्कॅनच्या अहवालाच्या आधारे पॉझिटिव्ह घोषित झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक लाख नव्वद हजार रुपये देखील उपचारासाठी कुटुंबीयांकडून घेण्यात आले होते पण रुग्णाचा कोरोना अहवाल नकारात्मक आला. यानंतर कुटुंबिय डॉक्टरांकडे पोहोचल्यावर त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या केबिनमधूनतून बाहेर येण्यास सांगितले.