"माझा बॉयफ्रेन्ड येतोय, मला त्याच्यासोबत जाऊ द्या" नववधूची सासरच्या लोकांना कळकळीची विनंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:18 IST2026-02-28T11:12:26+5:302026-02-28T11:18:28+5:30
Viral News: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीच्या खोलीत जाण्याऐवजी या नववधूने आपल्या प्रियकरासोबत जाण्याची मागणी केली आणि त्यानंतर सासरच्या घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो.

"माझा बॉयफ्रेन्ड येतोय, मला त्याच्यासोबत जाऊ द्या" नववधूची सासरच्या लोकांना कळकळीची विनंती!
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल असतात, यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. तर,काही व्हिडीओ अनेकांना मोठा धक्का देणारी ठरतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक नववधू आपल्या प्रियकरासोबत जाण्यासाठी सासरच्या मंडळींकडे कळकळीची विनंती करताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर या नववधूच्या सासूचा पारा चढतो आणि त्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील रथ पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याचे वृत्त आहे. व्हिडिओमध्ये एका कुटुंबातील सदस्य एका ठिकाणी जमल्याचे पाहायला मिळत आहे, तर, नवविवाहित वधू आणि तिची सासू एकमेकांसमोर बसलेल्या आहेत. दोघांमध्ये संभाषण सुरू असताना अचानक सासूचा पारा चढतो आणि ती नववधूला मारहाण करते.
नववधून लग्नाच्या पहिल्या दिवशी पतीच्या खोलीत जाण्यास नकार दिल्यानंतर हा वाद पेटल्याचे दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नववधूने आपल्या सासरच्या मंडळीकडे तिच्या बॉयफ्रेन्डसोबत जाऊ देण्याची विनंती केली. मात्र, यानंतर सासू संतापली आणि तिने नववधूला मारहाण करण्यास सुरुवात केली. परंतु, नववधूला मारहाण करण्यात का आली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
सुहागरात के दिन फैली दुल्हन, बोली मैं कमरे में नहीं जाऊंगी मेरा प्रेमी आ रहा है मैं उसके साथ जाऊंगी, जिसके बाद सास ने मौके पर ही नई नवेली दुल्हन की जमकर धुनाई कर दी
— Ocean Jain (@ocjain4) February 26, 2026
मामला यूपी के हमीरपुर जिले के राठ थाना क्षेत्र का pic.twitter.com/fiAVjt0y0i
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ocjain4 नावाच्या अकाउटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, लग्नाच्या पहिल्या दिवशी नववधूने पतीच्या खोलीत जाण्यास नकार दिला. तसेच तिचा बॉयफ्रेन्ड येतोय आणि तिला त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट केला. मात्र, यामुळे संतापलेल्या सासूने नववधूला मारहाण केली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही जण वधूच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काही जण सासूच्या शारीरिक हल्ल्यावर टीका करत आहेत. अनेक वापरकर्ते म्हणतात की, परिस्थिती कशीही असली तरी कोणालाही हात उचलण्याचा अधिकार नाही. तर काही जण याला कुटुंबातील पर्सनल वाद म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.