Mumbai Viral Video: रस्त्याच्या कडेला बसून तरुणी-महिलांचे बनवत होता व्हिडीओ, नंतर...; खारमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:59 IST2026-03-08T10:56:44+5:302026-03-08T10:59:00+5:30

Mumbai Crime Video: मुंबईतील खारमध्ये एक घटना समोर आली आहे. दुसऱ्या राज्यातील एक तरुण रस्त्याच्या कडेला बसून प्रवास करणाऱ्या तरुणी-महिलांचे व्हिडीओ शूट करत होता. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. 

Mumbai Viral Video: He was sitting on the side of the road and making videos of young women, then...; Incident in Khar | Mumbai Viral Video: रस्त्याच्या कडेला बसून तरुणी-महिलांचे बनवत होता व्हिडीओ, नंतर...; खारमधील घटना

Mumbai Viral Video: रस्त्याच्या कडेला बसून तरुणी-महिलांचे बनवत होता व्हिडीओ, नंतर...; खारमधील घटना

'ही माझ्या समोर घडलेली खरी घटना आहे. खार सबवेजवळ मी रस्त्याच्या कडेने जात होतो. तेव्हा तो त्याच्या मोबाईलमध्ये रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवत होता', असे सांगत एका तरुणाने मुंबईतील खारमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणाला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला चांगलाच चोपला आणि नंतर खार पोलिसांच्या ताब्यात दिले गेले.  

वराह वॉरिअर नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच मोबाईलमधील व्हिडीओ दिसत आहेत. त्यात एक महिला रिक्षातून प्रवास करत असताना व्हिडीओ बनवला गेला आहे. त्यानंतर तरुण आणि त्याच्यासोबत पोलीस दिसत आहेत. 

व्हिडीओ शेअर करताना या तरुणाने म्हटले आहे की, हा सगळा प्रकार माझ्यासमोर घडला. मी खार सबवेजवळच्या रोडने जात होतो. रोडच्या कडेला एक उत्तर प्रदेशातील तरुण (कामासाठी मुंबईत आलेला) उभा होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि तो काहीतरी व्हिडीओ बनवत होता. पण, हा तरुण रोडवरुन जाणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवत होता. मी त्याला झापले आणि त्याच्या कानशि‍लातही लगावल्या. मी सगळे पुरावे घेतले आणि त्याला खार पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. 

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याला आणखी मारायला हवं होतं, असं म्हटलं आहे तर काहींनी उत्तर प्रदेशातील आहे म्हणून टार्गेट केलं, असा आरोप केला आहे. 

Web Title : मुंबई: सड़क पर महिलाओं का वीडियो बनाते पकड़ा गया, पुलिस को सौंपा

Web Summary : मुंबई के खार में एक आदमी सड़क पर महिलाओं का वीडियो बनाते हुए पकड़ा गया. पकड़ने वाले व्यक्ति ने उसका सामना किया, सबूत लिए और उसे खार पुलिस को सौंप दिया.

Web Title : Mumbai: Man Filming Women on Street Caught, Handed to Police

Web Summary : A man in Khar, Mumbai, was caught filming women on the street. The person who caught him confronted him, took evidence, and handed him over to the Khar police.