मुलीसोबत डान्स केला; नोकरी गमावून घरी गेला, 'Video' व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:52 AM2023-12-14T10:52:09+5:302023-12-14T10:53:55+5:30

ट्रेनमध्ये तरुणीसह डान्स करणं होमगार्डला महागात पडलं आहे.

mumbai railway police take action againest cop dance with a girl in local train video goes viral on social media | मुलीसोबत डान्स केला; नोकरी गमावून घरी गेला, 'Video' व्हायरल 

मुलीसोबत डान्स केला; नोकरी गमावून घरी गेला, 'Video' व्हायरल 

Viral Video  : धावत्या लोकलमध्ये एका तरुणीसोबत गणवेशात डान्स करणाऱ्या एस. एफ. गुप्ता या होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावर व्हायरल होताच दादर लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लोकलमध्ये रील्स करणारे रील्सस्टार रेल्वेच्या रडारवर आहेत. सोशल मीडियावर लोकलमध्ये डान्स करणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  

व्हिडीओमध्ये होमगार्डही डान्स करत असल्याचे दिसत होते. तरुणीने रील्स हिट होण्यासाठी महिला डब्यात तैनात असलेल्या होमगार्डला डान्ससाठी विनंती केली होती. त्यानंतर चित्रित झालेला या दोघांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, सध्या लोकल आणि फलाटांवर रील्स करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय तरुण प्रवाशांबरोबर प्रँक करण्याचे रील्सही तयार केले जात आहेत. मात्र, याने लोकल प्रवाशांची आणि रेल्वेची डोकेदुखी वाढू लागली आहे. 


...अशी घडली घटना? 

 ६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १०:१० ते १०:१५ वाजेदरम्यान ही घटना घडली.

 एक अभिनेत्री-गायिका तिच्या मुलीसोबत चिंचपोकळी ते सॅण्डहर्स्ट रोड, असा प्रवास करत होती. 

 अभिनेत्रीची मुलगी डब्यात नाचू लागली. होमगार्डने तरुणीला नाचण्यासाठी हटकले होते.

 तरुणीने मात्र होमगार्डला विनंती करत डान्स  केला. नंतर होमगार्डनेही तिच्याबरोबर डान्स केला.


येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: mumbai railway police take action againest cop dance with a girl in local train video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.