खाकी वर्दीतील जेम्स बाँड तुम्ही ऐकला का? सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय पोलिसांचा 'हा' व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:23 IST2021-08-25T14:16:52+5:302021-08-25T14:23:56+5:30
मुंबई पोलिसांचा बँड (Mumbai Police Band) हे मुंबई पोलिस दलाचे वैशिष्ट्यच. याच वैशिष्ट्याचा विशेष वापर करत मुंबई पोलिसांनी हॉलीवु़डपटातील ऑनस्क्रीन हिरो जेम्स बाँडच्या चित्रपटाची थीम रिक्रिएट केली आहे.

खाकी वर्दीतील जेम्स बाँड तुम्ही ऐकला का? सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय पोलिसांचा 'हा' व्हिडिओ
खाकी वर्दीचा सोशल मिडिया (social media) हँडल्सवरदेखील दबदबा आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai police)सोशल मिडिया हँडलवरील अनेक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतात. जर तुम्ही सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असाल तर मुंबई पोलिसांच्या क्रिएटीव्ह पोस्ट्सची तुम्हाला खबरबात असेलच. असाच एक मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यावर अन् ऐकल्यावर तुम्हाला मुंबई पोलिसांचे कौतुक करायला शब्द अपूरे पडतील.
मुंबई पोलिसांचा बँड (Mumbai Police Band) हे मुंबई पोलिस दलाचे आणखी एक वैशिष्ट्य. याच वैशिष्ट्याचा विशेष वापर करत मुंबई पोलिसांनी हॉलीवु़डपटातील ऑनस्क्रीन हिरो जेम्स बाँडच्या चित्रपटाची थीम रिक्रिएट केली आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच जेम्स बाँड थीम बाय खाकी स्टुडिओ (James Bond Theme Khaki Studio) असे शब्द दिसतील. त्यानंतर मुंबई पोलिसांचा लोगो अन् मग संगीत सुरु होतं. यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे अभिनेता डॅनियल क्रेग याच्या आगामी 'नो टाईम टु डाय' या चित्रपटाच्या गाण्यासहित एक ट्विस्टही दिला आहे. तसेच या चित्रपटातील अॅक्शन सीन्सही या व्हिडिओत दिसतात. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठीही एक वेगळीच ट्रीट ठरली आहे.
या व्हिडिओद्वारे त्यांनी जेम्स बाँड थिमचे गायक माँटी नॉर्मन यांना श्रद्धांजली दिली आहे. माँटी नॉर्मन यांनी ही थीम १९६२ साली आलेल्या Dr. No या चित्रपटासाठी तयार केली होती. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय.