चालत्या लोकलला मोबाईल लटकवत प्रवाशाचा अफलातून जुगाड; Video एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:45 IST2023-12-15T14:43:12+5:302023-12-15T14:45:48+5:30
लोकल ट्रेनला मोबाईल लटकवत प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल...

चालत्या लोकलला मोबाईल लटकवत प्रवाशाचा अफलातून जुगाड; Video एकदा पाहाच
Viral Video : मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात लोकल ट्रेनमधून प्रवास करणं हे मोठं आव्हान आहे. रोज याच गर्दीतून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास सुरू असतो. मुंगीलाही शिरता येणार नाही, अशा प्रवाशांच्या गर्दीने लोकल फुल्ल झालेली असते. यातच मुंबई लोकलमध्ये व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांना चकित केले आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये एका प्रवाशाने केलेला देसी जुगाड, सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पाय फिरकवायला जागा नसणाऱ्या लोकलमध्ये या प्रवाशाच्या भन्नाट कल्पनेने नेटकरी चकित झाले आहेत. सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कधी तरुण-तरुणी थिरकताना दिसतात, तर कधी सरफिरे आशिक थिरकताना दिसतात. मात्र, प्रसिद्धीची हवा डोक्यात शिरल्याने कोण काय करेल हे सांगता येत नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित तरुण मुंबई लोकलच्या दरवाज्याजवळ उभा असलेला दिसत आहे. हा प्रवास करताना या व्यक्तीने त्याचा मोबाईल लोकलच्या बाहेरील बाजुस लटकवला आहे. कानात इअरफोन घालून ट्रेनला मोबाईल लटकवत हा प्रवासी मजेत प्रवास करतोय. या प्रवाशाचा अनोखा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इंस्टाग्रावर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. १२ डिसेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हा व्हिडीओ ६० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
येथे पाहा व्हिडीओ :