Motivational Video:प्रेरणादायी: दिव्यांग झोमॅटो डिलिव्हरी बॉयची व्हिलचेअरवरून डिलिव्हरी, नेटकऱ्यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:53 IST2022-07-28T16:00:58+5:302022-07-28T16:53:54+5:30
Motivational Video: हा व्हिडिओ पाहून तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

Motivational Video:प्रेरणादायी: दिव्यांग झोमॅटो डिलिव्हरी बॉयची व्हिलचेअरवरून डिलिव्हरी, नेटकऱ्यांनी केले कौतुक
Motivational Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून अनेकांना जगण्याची-लढण्याची प्रेरणा मिळते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झोमॅटो आणि स्विगीसारख्या कंपन्यांची फूड डिलिव्हरी वाढली आहे. झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओची विशेषता म्हणजे, हा डिलिव्हरी करणारा व्यक्ती अपंग असून, तो व्हीलचेअरवरुन फूड डिलिव्हरी करतोय. त्याचा हा व्हिडिओ पाठीमागून कारने येणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कॅप्चर करुन व्हायरल केला. हा डिलिव्हरी बॉय त्याच्या इलेक्ट्रीक व्हीलचेअरवरुन डिलिव्हरीसाठी जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडिओ...
नेटकऱ्यांनी केले कौतुक
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना खूप प्रेरणा मिळत आहे. काही लोकांनी झोमॅटोचे कौतुक केले. तर काहींनी लिहिले की आयुष्यात काहीही अशक्य नाही. त्यावर एका यूजरने लिहिले की, 'प्रेरणेचे सर्वोत्तम उदाहरण.' असे व्हिडीओ लोकांना जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास प्रेरित करतात.