Social Viral: आई म्हणाली, मी प्रेमात पडलेय, मग मुलांनी थाटामाटात लावून दिलं तिचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 22:11 IST2022-01-16T22:10:27+5:302022-01-16T22:11:03+5:30
Social Viral: प्रेमात पडलेल्या आईचं दोन मुलांनी थाटामाटात लग्न लावून दिल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. एका मुलीने तिच्या आईच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आणि कशाप्रकारे १५ वर्षांनंतर तिची सिंगल मदर असलेली आई पुन्हा लग्न करत आहे, यावर भावूक पोस्ट केली आहे.

Social Viral: आई म्हणाली, मी प्रेमात पडलेय, मग मुलांनी थाटामाटात लावून दिलं तिचं लग्न
मुंबई - प्रेमात पडलेल्या आईचं दोन मुलांनी थाटामाटात लग्न लावून दिल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. ही घटना डिसेंबर २०२१ मधील आहे. एका मुलीने तिच्या आईच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आणि कशाप्रकारे १५ वर्षांनंतर तिची सिंगल मदर असलेली आई पुन्हा लग्न करत आहे, यावर भावूक पोस्ट केली आहे. दरम्यान, लोकांना या मुलांची पोस्ट खूप आवडली आहे.
Humans Of Bombay ने ही सत्यकथा आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केली आहे. या महिलेचं नाव सोनी सोमानी असं आहे. त्यांची मुलगी श्रेया हिने सांगितले की, जेव्हा तिची आई १७ वर्षांची होती, तेव्हाच तिचं लग्न झालं होतं. तिचं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं. त्यानंतर १८ व्या वर्षी तिनं श्रेया ह्या मुलीला जन्म दिला. तर काही वर्षांनी समीर जन्मला.
श्रेया हिने सांगितले की, तिचे वडील आईला खूप क्रूर वागणूक देत असत. ते तिला खूप मारहाण करत असत. जेव्हा ती गर्भवती होती. तेव्हाही त्यांनी तिला मारहाण केली होती. त्यानंतर तिने माहेरच्या लोकांची मदत मागितली होती. मात्र मदत करण्याऐवजी तिला पतीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला.
श्रेयाने पुढे सांगितले की, तिने आणि तिच्या भावाने लहानपणापासूनच वडिलांना आईला शिविगाळ करताना पाहिलं होतं. आम्ही आईला सोडून शाळेतही जात नव्हतो. आम्ही शाळेत गेलो आणि मागे वडिलांनी आईला मारलं तर काय, अशी भीती आम्हाला वाटायची. आम्ही आईला वाचवायला गेलो तर उलट ते आम्हालाही मारायचे.