माकड चक्क भांडी धुतंय! कष्ट करणाऱ्या माकडाला पाहुन नेटकरी म्हणाले याला एम्प्लॉयी ऑफ द इयर अवॉर्ड द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:39 IST2021-10-26T15:39:06+5:302021-10-26T15:39:50+5:30
एका व्हायरल व्हिडिओतील माकड चक्क हॉटेलमध्ये भांडी धुतंय. ते इतकं कष्ट करतंय की ते पाहुन तुम्ही म्हणाल या माकडाला एम्प्लॉयी ऑफ द इअर चा अवॉर्ड घोषित करा.

माकड चक्क भांडी धुतंय! कष्ट करणाऱ्या माकडाला पाहुन नेटकरी म्हणाले याला एम्प्लॉयी ऑफ द इयर अवॉर्ड द्या
माणसं आपल्या पोटापाण्यासाठी कष्ट करतात, नोकरी करतात. पण तुम्ही कधी माकडाला काम करताना पाहिलं आहे का? एका व्हायरल व्हिडिओतील माकड चक्क हॉटेलमध्ये भांडी धुतंय. ते इतकं कष्ट करतंय की ते पाहुन तुम्ही म्हणाल या माकडाला एम्प्लॉयी ऑफ द इअर चा अवॉर्ड घोषित करा.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड भांडी धुताना दिसत आहे. त्याला पाहुन लोकांना आश्चर्य वाटत आहे. माकड नीट मन लावून भांडी धुत आहे. भांडी धुतल्यानंतर त्यात काही घाण राहिली आहे का, याचीही तो तपासणी करत आहे.
अरे गजब! pic.twitter.com/QStH8eDWgL
— पनौति (@panauti96) October 23, 2021
माकडाच्या मेहनतीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, दोन वेळच्या भाकरीसाठी माणसांनीही या माकडासारखे काम करावे. दुसरीकडे, दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हा तर एम्पॉली ऑफ द मंथ अवॉर्ड आहे. याशिवाय अनेकांनी इमोजीज द्वारे आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.