Video : गटागट दारू ढोसल्यावर माकडाने केली जबरदस्त अ‍ॅक्टिंग, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 12:49 IST2021-11-12T12:43:08+5:302021-11-12T12:49:37+5:30

Monkey Viral Video : अलिकडे सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर  केले जातात. आता व्हायरल झालेला हा व्हिडीओच बघा. कशाप्रकारे एक माकड गटागट दारू पितो आहे.

Monkey Viral Video: Monkey drink liquor funny video | Video : गटागट दारू ढोसल्यावर माकडाने केली जबरदस्त अ‍ॅक्टिंग, व्हिडीओ व्हायरल

Video : गटागट दारू ढोसल्यावर माकडाने केली जबरदस्त अ‍ॅक्टिंग, व्हिडीओ व्हायरल

मैने होठोंसे लगाई तो हंगामा हो गया....हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर माकडाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ माकडाने दारू प्यायल्यानंतर असे काही हावभाव केले, जे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. इतकंच नाही तर यूजर हा व्हिडीओ पाहिल्यावर या भरभरून प्रतिक्रियाही देत आहेत. विश्वास ठेवा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल.

अलिकडे सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर  केले जातात. आता व्हायरल झालेला हा व्हिडीओच बघा. कशाप्रकारे एक माकड गटागट दारू पितो आहे. दोन माकड सोबत बसले आहेत, त्यातील एक माकडाच्या हातात दारूची बॉटल आहे. तो मस्त मजेने दारूचे एकएक घोट घेत आहे. त्यानंतर माकडाने जे हावभाव दिले ते बघून लोक अवाक् झालेत.

माकडाचा हा अनोखा अंदाज पाहून तुम्हीही खदखदून हसाल. कारण माकडाचा हा असा अंदाज तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल. माकडाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ राजू विजय नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात  आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पाच हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 
 

Web Title: Monkey Viral Video: Monkey drink liquor funny video