माकडासोबत सेल्फी काढायला गेला अन् माकडाने केला भयानक हल्ला, महागात पडला हा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:14 IST2021-09-16T15:13:16+5:302021-09-16T15:14:31+5:30
एका तरुणाचा माकडासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न फसला आहे. तो तरुण त्या माकडासोबत सेल्फी घ्यायला गेला अन् राग आलेल्या माकडाने तरुणावरच हल्ला चढवला...

माकडासोबत सेल्फी काढायला गेला अन् माकडाने केला भयानक हल्ला, महागात पडला हा सेल्फी
अनेक पर्यटनस्थळी माकडं असतात. त्यांना पाहताच अनेकांना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. काहीजण त्यांना खायला देतात आणि त्यांचे फोटो काढुन घेतात. एका तरुणाचा असाच प्रयत्न फसला आहे. तो तरुण त्या माकडासोबत सेल्फी घ्यायला गेला अन् राग आलेल्या माकडाने तरुणावरच हल्ला चढवला...
व्हिडीओत पाहू शकता माकड एका ठिकाणी शांत बसलं आहे. तरुण त्या माकडाजवळ जातो आणि सेल्फी काढण्यासाठी पोझ देतो. माकडाचं त्या तरुणाकडे लक्ष नसतं. ते त्याच्याकडे पाठ करून बसलेलं असतं. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येते आणि ती माकडाच्या पाठीवरून हात फिरवते.
आपल्याला कुणीतरी स्पर्श केला म्हणून माकड मागे वळून पाहतं. ते खूप रागात असतं. त्याचवेळी त्याच्यासोबत सेल्फी काढणारा तरुणही त्याच्याकडे पाहतो. त्या तरुणाला पाहताक्षणी माकड त्या तरुणावर हल्ला करतो. माकड तरुणाच्या हाताला पकडतो आणि जोरात चावतो.
videolucu.funny इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहुन त्या बिचाऱ्या तरुणाची खुप दया येते पण हसूही आवरत नाही. अनेकांनी हा व्हिडिओ लाईर केला असून यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.