जिममध्ये सुंदर मॉडलला एकटी पाहून छेडछाड करू लागला होता तरूण, पुढे जे झालं ते बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 13:36 IST2023-02-17T13:35:21+5:302023-02-17T13:36:17+5:30
Beautiful Model Molested : तरूणीचं नाव नशाली अल्मा असून ती 24 वर्षांची आहे. व्हिडीओची सुरूवात अमेरिकेच्या फ्लोरिडामधील टाम्पामध्ये इनवुड पार्क अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या एका जिममधून नशलीच्या वर्कआउटने होते.

जिममध्ये सुंदर मॉडलला एकटी पाहून छेडछाड करू लागला होता तरूण, पुढे जे झालं ते बघून व्हाल अवाक्...
Beautiful Model Molested : फिटनेस मॉडल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला तिच्या बहादुरीसाठी सोशल मीडियावर खूप कौतुकाची थाप मिळत आहे. जिममध्ये फिटनेस मॉडलसोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी या महिलेचं कौतुक केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरूणीचं नाव नशाली अल्मा असून ती 24 वर्षांची आहे. व्हिडीओची सुरूवात अमेरिकेच्या फ्लोरिडामधील टाम्पामध्ये इनवुड पार्क अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या एका जिममधून नशलीच्या वर्कआउटने होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जेविअर थॉमस-जोन्स नावाचा आरोपी जिम मध्ये येताना दिसत आहे. तो जिमच्या बाहेर उभा आहे आणि नशाली त्याला आत येण्यासाठी दरवाजा उघडते. त्यानंतर ती तिचं वर्कआउट करू लागते. काही वेळाने आरोपी तिच्याजवळ येतो आणि तिच्यासोबत छेडछाड सुरू करतो.
विरोध करूनही नशालीला आरोपी जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतो. पण नशाली त्याच्यासोबत बहादुरीने लढते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक बुक्की मारते. काही वेळाने आरोपी तिच्यासमोर हार मानतो.
हिल्सबोरो काउंटी शेरिफ ऑफिस द्वारे इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओद्वारे आपली कहाणी सांगताना नशाली म्हणाली की, 'जसा तो माझ्याजवळ आला, मी त्याला धक्का दिला. मी त्याला विचारलं की, काय करतोय? माझ्यापासून दूर रहा. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न बंद कर. त्याने माझा पाठलाग करणं सुरू केलं. माझा सल्ला हा आहे की, कधी हार मानू नका. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच सांगितलं आहे की, कधीही हार मानायची नाही आणि मी जेव्हा त्याच्यासोबत लढत होते तेव्हा हे माझ्या लक्षात होतं'.