मी अजून मेलेली नाही...Mia Khalifa ने मृत्युच्या अफवेवर दिली प्रतिक्रिया, शेअर केलं फनी मीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:58 IST2022-02-01T16:57:41+5:302022-02-01T16:58:36+5:30
Mia Khalifa : मिया खलिफाने ट्विटरवर हे मीम शेअर केलंय. या मीमच्या माध्यमातून तिने या अफवेचं खंडन केलं आहे. मियाने लिहिलं की, 'मी अजून मेलेली नाही. मला बरं वाटत आहे'.

मी अजून मेलेली नाही...Mia Khalifa ने मृत्युच्या अफवेवर दिली प्रतिक्रिया, शेअर केलं फनी मीम
सोशल मीडियावर कधी कोणती अफवा पसरवली जाईल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी मॉडल मिया खलिफाच्या (Mia Khalifa) मृत्यूबाबत बातमी समोर आली होती आणि सगळेच चकीत झाले. पण जसं याबाबत मिया खलिफाला समजलं तिने सर्वांची शंका दूर केली. एकी मीमच्या माध्यमातून तिने सांगितलं की, ती अजून जिवंत आहे. तेव्हा कुठे तिच्या फॅन्सने मोकळा श्वास घेतला असेल.
मिया खलिफाने ट्विटरवर हे मीम शेअर केलंय. या मीमच्या माध्यमातून तिने या अफवेचं खंडन केलं आहे. मियाने लिहिलं की, 'मी अजून मेलेली नाही. मला बरं वाटत आहे'. मिया खलिफाचं फेसबुक अकाऊंट मेमोरियलाइज्ड केलं गेलं होतं. तिच्या नावाआधी त्यावर रिमेंबरिंग असं लिहिलं होतं. फॅन्सही तिचा हा मेसेज वाचून आनंदी झाले.
— Mia K. (@miakhalifa) January 30, 2022
एका यूजरने लिहिलं की, वेलकम बॅक. मला आनंद आहे की, तू परत आलीस. आम्ही तुला मिस केलं. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं क, तुला बघून आनंद वाटला. फॅन्स हार्ट इमोजीज शेअर करत आहेत. तर काही लोक तिच्यासंबंधी काही मिम्स शेअर करत आहेत.
मिया खलिफा जगभरात चांगलीच पॉप्युलर आहे आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फेसबुकवर मियाला ४.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तेच इन्स्टाग्रामवर तिचे २६.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर तिचे ४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. ही पहिली नाही की, एखाद्या स्टारच्या मृत्यूची अफवा पसरली. याआधीही अनेकांना याचा सामना करावा लागला.