याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:27 IST2025-06-21T16:26:33+5:302025-06-21T16:27:06+5:30

आजच्या काळात अशा प्रामाणिकपणाचे दर्शन होणे अत्यंत कठीण असल्याचे लोक म्हणत आहेत.

Mizoram Aizawl auto driver Businessman forgot lakhs of rupees in rickshaw, honest rickshaw driver returned You will be surprised to know the amount | याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!

याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!

मिझोरममधील एका ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचे एक असे उदाहरण प्रस्तुत केले आहे, ज्यामुळे अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या ऑटोचालकाच्या ऑटोमध्ये एका व्यापाऱ्याचे लाखो रुपये विसरले होते. हे लक्षात आल्यानंतर चालकाने त्याचे सर्व पैसे परत केले. ही घटना समोर आल्यानंतर लोक या ऑटो चालकावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आजच्या काळात अशा प्रामाणिकपणाचे दर्शन होणे अत्यंत कठीण असल्याचे लोक म्हणत आहेत.

व्यावसायिकाने बुक केली होती ऑटो -
मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील एक व्यावसायिक गुरुवारी सकाळी ९ वाजता मिझोरममधील लंगतलाई येथे पोहोचला. त्याने येथे एक ऑटो रिक्षा भाड्यने घेतली. तो ऑटोमधून बराच फिरला. मात्र, ऑटो सोडताना त्याची पैशांनी भरलेली पॉलिथिनची बॅग ऑटोमध्येच विसली. जेव्हा संबंधित व्यावसायिक हॉटेलमध्ये परतला, तेव्हा त्याला पैशांची आठवण झाली. यानंतर त्याने हॉटेलमध्ये शोधाशोध सुरू केली. माहिती मिळाल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही शोधाशोध केली. मात्र, कुठेही काहीही सापडले नाही. ही रक्कम थोडी थोडकी नव्हती, तर तब्बल १७ लाख रुपये एवढी होती. 

दरम्यान, काही वेळातच ऑटोचालक लाहमिंगमुआनाला त्याच्या ऑटोमध्ये ही पैशांनी भरलेली बॅग दिसून आली. यानंतर, त्याने ज्या हॉटेलमध्ये व्यावसायिकाला सोडले होते, त्या हॉटेलमध्ये तो पोहोचला. येथे त्याने संबंधित व्यापाऱ्याला त्याचे १७ लाख रुपये परत केले. पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यावसायिकही खूश झाला. त्याने ऑटो चालकाला काही बक्षीस देऊ केले. मात्र, ऑटोचालकाने यास नकार दिला. लंगतलाई ऑटो रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष सी जठियांगा यांनी संबंधित ऑटो रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे.
 

Web Title: Mizoram Aizawl auto driver Businessman forgot lakhs of rupees in rickshaw, honest rickshaw driver returned You will be surprised to know the amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.