काय सांगता! मॉडलिंगमध्ये करिअर करतंय हे खरंखुरं अस्वल, रशियन मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल!
By अमित इंगोले | Updated: October 19, 2020 16:01 IST2020-10-19T15:53:27+5:302020-10-19T16:01:36+5:30
फोटोग्राफर Mila Zhdanova रशियातील मॉस्कोत राहते. ती एका २८ वर्षीय अस्वलाला भेटली. या अस्वलाचं नाव आहे स्टीपन.

काय सांगता! मॉडलिंगमध्ये करिअर करतंय हे खरंखुरं अस्वल, रशियन मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल!
फोटोग्राफर Mila Zhdanova रशियातील मॉस्कोत राहते. ती एका २८ वर्षीय अस्वलाला भेटली. या अस्वलाचं नाव आहे स्टीपन. हे अस्वल Svetlana आणि Yurkiy Panteleenako यांच्या मालकीचं आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे अस्वल मॉडलिंग करत आहे. या अस्वलांचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टीपन तीन महिन्याचा होता तेव्हा त्याची आई त्याला सोडून गेली होती. त्याची खासियत म्हणजे तो मनुष्यांमध्ये वाढला. हे अस्वल टीव्ही बघतं, पाण्यात खेळतं. तो इतर जंगली अस्वलांप्रमाणे रागीटही आहे.
Mila से स्टीपनची वागणूक पाहून त्याच्या फोटोंची सीरीज काढली. स्टीपनला तिने एका रशियन मॉडलसोबत शूट केलं. स्टीपनही फोटोशूट करताना चांगलाच रूळला होता. Mila ने त्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
तुम्ही अनेक प्राण्यांचे फोटोशूट पाहिले असतील किंवा जंगलात मोकळेपणाने त्यांचे फिरतानाचे फोटोही पाहिले असतील. पण एखाद्या इतक्या विशाल प्राण्याला मॉडलिंग करताना कधी पाहिलं नसेल. त्यात अस्वलाला तर नक्की पाहिलं नसेल.