काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
By Manali.bagul | Updated: September 20, 2020 13:10 IST2020-09-20T13:01:49+5:302020-09-20T13:10:25+5:30
कुत्रा किंवा मांजर नाही तर या माणसानं बैलाला आपल्या बाईकवर बसवलं आहे आणि डबलसीट घेऊन जात आहे. तुम्ही असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल.

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
(Image credit- change.org)
तुम्ही अनेकदा लोकांना आपल्या पाळीव जनावरांना वाहनांवरून घेऊन जातााना पाहिलं असेल. कधी कुत्रा, मांजर तर कधी वेगवेगळ्या पक्ष्यांनाही लोक आपल्या वाहनांवरून फिरवतात. सध्या सोशल मीडिया एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कुत्रा किंवा मांजर नाही तर या माणसानं बैलाला आपल्या बाईकवर बसवलं आहे आणि डबलसीट घेऊन जात आहे. तुम्ही असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डबलसीट मागे बैल बसला आहे. दुचाकीवरून त्याचा तोल जाऊ नये किंवा तो हलू नये आणि त्यामुळे चालकाचा तोल जाऊ नये म्हणून दुचाकीस्वारानं छान त्या बैलाला बांधलं आहे. दोघंही दुचाकीवरून जात असताना कारमधील प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुनिल ग्रोवर यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या भन्नाट विनोदीशैलीने सुनिल ग्रोवर नेहमीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.
सध्या या डबलसीट प्रवास करत असलेल्या बैलाचा व्हिडीओ सुनिलनं आपल्या प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे. आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र या तरुणानं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. कारमध्ये बसलेल्या एका माणसानं हा व्हिडीओ शुट केला असावा असं दिसून येत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर कारमधील मंडळीही हसण्याचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
हे पण वाचा-
सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...