VIDEO : King Cobra सोबत खेळत होता व्यक्ती, अचानक त्याने केला हल्ला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:18 IST2022-09-01T14:17:33+5:302022-09-01T14:18:31+5:30
King Cobra Video:किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक मानला जातो. जर यांच्यासोबत कुणी खेळ केला तर त्यांचा जीव काही सेकंदात जाईल.

VIDEO : King Cobra सोबत खेळत होता व्यक्ती, अचानक त्याने केला हल्ला आणि मग...
King Cobra Attack Video: जगात असे फार कमी लोक आहेत जे सापाला बघितल्यावर घाबरत नाहीत. जास्तीत जास्त लोक सापाला दुरूनच बघून घाबरतात. जसे की, आपल्याला माहीत की, सोशल मीडियावर नेहमीच सापांसंबंधी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही मजेदार असतात तर काही हैराण करणारे असतात. पण आता जो व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो अंगावर काटे आणणारा आहे. किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक मानला जातो. जर यांच्यासोबत कुणी खेळ केला तर त्यांचा जीव काही सेकंदात जाईल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती खुल्या मैदानात एका किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे.
जर कुमाही समोर अचाकन साप आला तर कुणीही घाबरतं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती किंग कोब्रासोबत खेळताना दिसत आहे. साप पकडणाऱ्या व्यक्तीने साधारण 12 फूट लांब किंग कोब्रा हातात पकडला आहे. यावेळी साप त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसला. मात्र, तो किंग कोब्राला नियंत्रित करतो, जसा तो त्याचा मित्र आहे. त्यानंतर व्यक्ती सापाला जंगलात सोडतो.
King Cobra हा व्हिडीओ साप पकडणाऱ्या व्यक्तीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 78 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आणि 1 लाख 76 हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.