बापरे..! अजगराशी खेळायला गेला अन् त्याने घातला गळ्याला विळखा; पाहा धक्कादायक Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 20:49 IST2022-12-15T20:48:19+5:302022-12-15T20:49:41+5:30
नुसते सापाचे नाव ऐकताच अनेकांचा थरकाप उडतो. एखादा छोटासा सापही समोर आला तर भीतीने अनेकांची पळता भुई होते.

बापरे..! अजगराशी खेळायला गेला अन् त्याने घातला गळ्याला विळखा; पाहा धक्कादायक Video...
Python Viral Video: नुसते सापाचे नाव ऐकताच अनेकांचा थरकाप उडतो. एखादा छोटासा सापही समोर आला तर भीतीने अनेकांची पळता भुई होते. कारण छोटासा सापही आपल्या विषाने काही मिनिटात जीव घेऊ शकतो. प्रत्येक साप विषारी नसतो, पण तरीही माणसाने सापापासून योग्य अंतर राखले पाहिजे. अनेकदा काही अतिशहने लोक सापाशी पंगा घेण्याचा विचार करतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या पाळी अजगराशी खेळताना दिसत आहे. अजगर विषारी नसतो, पण तो गळ्याभोवती विळखा घालून माणसाचा जीव घेऊ शकतो. या व्हिडिओमध्येही अशाच प्रकारचे दृष्य पाहायला मिळते. हा अजगर अचानक त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती विळखा घालतो आणि त्याचा श्वास बंद करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तिथे उपस्थित एक महिला आणि इतर पुरुष त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात.
व्हिडिओ पहा-
व्हिडिओच्या शेवटपर्यंत दाखवण्यात आलंय की, तिथे उपस्थित सर्वजण त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण, अखेर व्हिडिओ संपतो आणि त्या व्यक्तीचे पुढे काय होते, ते समजू शकत नाही. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर laris_a9393 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.