सोफ्यावर बसुन सिंहासोबत मस्ती करत होता, भडकलेल्या प्राण्याने अचानक केलं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 18:27 IST2022-06-05T18:22:39+5:302022-06-05T18:27:39+5:30
सहसा अरब देशांतील लोक सिंहांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. या व्हिडिओमध्येही (Lion Viral Video) एक व्यक्ती सिंहासोबत आरामात सोफ्यावर असा बसलेला आहे, जणू तो घरातील पाळीव कुत्रा किंवा मांजरीसोबत आराम करत आहे.

सोफ्यावर बसुन सिंहासोबत मस्ती करत होता, भडकलेल्या प्राण्याने अचानक केलं भयंकर कृत्य
सिंह हा जगातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. प्राणीसंग्रहालयात बंदिस्त सिंह पाहण्यासाठी गेलेले लोकही सिंहाच्या आसपास भटकायलाही घाबरतात. मात्र काही धाडसी लोक असेही आहेत जे या घातक प्राण्यालाही अगदी कुत्रा किंवा मांजरीप्रमाणे पाळतात.
सध्या अशाच एका व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सोफ्यावर सिंहासोबत आराम करत मजा करताना दिसत आहे (Lion and Man Friendship). सहसा अरब देशांतील लोक सिंहांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. या व्हिडिओमध्येही (Lion Viral Video) एक व्यक्ती सिंहासोबत आरामात सोफ्यावर असा बसलेला आहे, जणू तो घरातील पाळीव कुत्रा किंवा मांजरीसोबत आराम करत आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत आपल्या लिव्हिंग रूममध्ये चिल करतो, तसाच हा व्यक्ती एका मोठ्या पांढऱ्या सिंहासह सोफ्यावर आरामात बसला आहे. दरम्यान, तिथे उपस्थित असलेली आणखी एक व्यक्ती थोडी मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसते. दोघे मिळून सिंहाला थोडा त्रास देतात तेव्हा सिंह भडकतो आणि आपल्या मालकाच्या मित्रावर वार करण्याचा प्रयत्न करतो. यात त्याचा धक्का लागून टेबलावर ठेवलेलं आईस्क्रीमही त्याच्या मालकाच्या अंगावर पडतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
ज्या व्यक्तीने सिंह पाळला आहे तो सिंह भडकल्यानंतरही अजिबात घाबरत नाही. त्याला या भयानक प्राण्याच्या तोंडात हात घालण्यासही भीती वाटत नाही. हा थक्क करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर lions.mr10 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 18 हजारांहून अधिकांनी लाईक केला असून शेकडो कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी या व्यक्तीला धाडसी म्हटलं, तर बहुतांश लोकांनी हे खूपच धोकादायक असल्याचं म्हटलं.