नसला उद्योग! स्टंटच्या नादात केलं शेजाऱ्याचं मोठं नुकसान, व्हिडीओ झाला व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:34 IST2021-07-16T19:30:28+5:302021-07-16T19:34:38+5:30
एक बाइक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती बाइकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

नसला उद्योग! स्टंटच्या नादात केलं शेजाऱ्याचं मोठं नुकसान, व्हिडीओ झाला व्हायरल...
सोशल मीडिया बाइक स्टंटचे अनेक खतरनाक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनात धडकी भरवणारे तर कधी पोट धरून हसायला लावणारे असतात. असाच एक बाइक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती बाइकवर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण त्याला जराही अंदाज नव्हता की, हे करत असताना तो शेजाऱ्याची भींत तोडेल. पावसात स्टंट करणं त्याला इतकं महागात पडेल याचा त्याने विचारही केला नसेल.
हा बाइक स्टंटचा व्हिडीओ 'splendor_bullet_love' नावाच्या एका यूजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय आणि काही दिवसातच या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. यात तुम्ही बघू शकता की, व्यक्ती बाइकचं समोरचं चाक वर करून बाइक चालवण्याचा प्रयत्न करतोय. पण बॅलन्स बिघडल्याने तो समोरच्या भींतीवर जाऊन आदळतो. (हे पण बघा : अतिशाहणपणा नडला! फुकटची स्टाईल मारायला गेली आणि तोंडावर आपटली...)
बाइकस्वारने हेल्मेट घातलेलं होतं. पण जर तो गर्दीच्या ठिकाणी किंवा कमी जागेवर स्टंट करत असला असता तर गंभीर जखमी झाला असता. त्याचा स्टंट पाहून शेजाऱ्यालाही अंदाज आला नाही की, पुढे काय होणार आहे. जेव्हा बाइक घसरली तेव्हा घराच्या भींतीचं नुकसान झालं.