Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:33 IST2025-08-07T17:29:39+5:302025-08-07T17:33:12+5:30
Viral News: रिल्स बनवण्याचे काही जणांना खरोखरच वेड लागले आहे.

Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
रिल्स बनवण्याचे काही जणांना खरोखरच वेड लागले आहे. त्यासाठी बरेच लोक जीवाचीही पर्वा देखील करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात धावत्या रेल्वेसमोर रील बनवणे एका तरुणाच्या अंगलट आले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे रुळाजवळून चालत असताना व्हिडिओ बनवत असल्याचे दिसत आहे. त्याला पाठीमागून येणाऱ्या रेल्वेचा आवाज ऐकू येत आहे. मात्र, तरीही तो बाजूला झाला नाही. तरुणाला असे वाटले की, रेल्वे त्याच्या जवळून गेली तर, हा व्हिडीओ चांगला होईल आणि त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येतील. पंरतु, या तरुणाचा अंदाज चुकला आणि पाठीमागून येणारी रेल्वे त्याला धडकून पुढे निघून जाते. सुदैवाने, रेल्वेचा वेग कमी असल्याने त्याला मोठी इजा झाली नाही.
बच गया रील पुत्र 😱😱😱 pic.twitter.com/A6aF4ekcOG
— Zoya Shamim Khan 🎀 (@ZoyaShamimKhan) August 6, 2025
@ZoyaShamimKhan या नावाच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीच्या कॅप्शनमध्ये तरुणाचा थोडक्यात जीव वाचला असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे? याबाबत समजू शकलेली नाही. मात्र, आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, अशा कृत्यांमुळे जर आपल्याला जीव गमवावा लागत असेल तर, मग अशी रील बनवण्याचा काय अर्थ आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, लोक रीलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहे. आणखी एका वापरकर्त्याने अशी कमेंट केली आहे की, सार्वजनिक किंवा धोकादायक ठिकाणी रील बनवण्यावर बंदी घालण्यात यावी, हे लोक स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालत आहेत.