पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने लागलीच देसी जुगाड केला...बाईकलाच बनवली सायकल अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 18:25 IST2021-10-31T18:21:48+5:302021-10-31T18:25:01+5:30
सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे...

पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने लागलीच देसी जुगाड केला...बाईकलाच बनवली सायकल अन्
सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेट जगतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून आपली मोटारसायकल सायकलमध्ये बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या भावाचं डोकं बघून इंजिनिअरही आपल्या कर्तबगारीवर संशय घेतील. कारण त्या माणसाने बाईकचा वरचा भाग काढून त्याच्या सायकलला बसवला आहे. एवढेच नाही तर त्याने ही सायकल-बाईक रस्त्यावर चालवण्यास सुरुवातही केली आहे.]
या जुगाडला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकांनी हा देसी जुगाडचा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘खरंच! या जुगाडाने माझं डोकं फिरवलं आहे.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हा विचित्र जुगाड पाहून आईन्स्टाईन आणि न्यूटन क्षणभर स्वर्गातून परत येतील'.