OMG! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्याची ही स्टाइल पाहून सगळेच झाले अवाक्, व्हिडीओ व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 11:25 IST2021-01-05T11:24:39+5:302021-01-05T11:25:51+5:30

एक ऑस्ट्रेलियातील व्हिडीओ समोर आला आहे. इथे एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी एका पक्ष्याचा वापर केला. 

Man takes help from cockatoo bird at zoo to propose to his girlfriend video goes-viral | OMG! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्याची ही स्टाइल पाहून सगळेच झाले अवाक्, व्हिडीओ व्हायरल....

OMG! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्याची ही स्टाइल पाहून सगळेच झाले अवाक्, व्हिडीओ व्हायरल....

प्रेमात सर्वात महत्वाचं असतं ते प्रेम व्यक्त करणं. या व्यक्त होण्यात एक खास बात असते. कारण हा क्षण त्या व्यक्तींना आयुष्यभर लक्षात राहणार असतो की, आपणं कसं प्रपोज केलं होतं. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक ऑस्ट्रेलियातील व्हिडीओ समोर आला आहे. इथे एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी एका पक्ष्याचा वापर केला. 

ऑस्ट्रेलियातील जू नावाच्या ट्विटर पेजवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे Jesse आणि Erin एका Black Cocktoo पक्ष्याला बघून आनंदी होतात. नंतर पो  पक्षी तरूणीच्या हातावर येऊन बसतो. ती त्याला पाच डॉलर देते आणि तो ते पैसे घेऊन जातो.

यादरम्यान तरूण प्रपोज करण्यासाठी करत असलेली तयारी बघू शकता. जसा पक्षी उडून जातो तो गुडघ्यावर बसून गर्लफ्रेन्डला प्रपोज करतो. या सगळ्या अंदाजाने भारावून गेलेली तरूणीही त्याला लगेच होकार देते आणि त्याला मिठी मारते. तिथे उपस्थित सगळे लोकही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकही दोघांना शुभेच्छा देत आहेत. प्रपोज करण्याच्या तरूणाच्या या अंदाजाचं लोक कौतुकही करत आहेत. 
 

Web Title: Man takes help from cockatoo bird at zoo to propose to his girlfriend video goes-viral