लोखंडी रॉडने भरलेल्या कंटेनरच्या बाजूला उभं राहणं पडलं महागात; 'Video' पाहून धक्काच बसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:53 IST2024-01-05T14:51:42+5:302024-01-05T14:53:24+5:30
आजकाल कधी काय घडेल हे सांगता येत नाही.

लोखंडी रॉडने भरलेल्या कंटेनरच्या बाजूला उभं राहणं पडलं महागात; 'Video' पाहून धक्काच बसेल
Viral Video : सोशल मीडिया हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनत चाललाय. गावापासून शहरापर्यंत कुठे, कधी, काय घडतंय याची चुणूक सोशल मीडियावर अगदी सहज लागते. वेगवेगळ्या माहितीचे भांडार असणाऱ्या या सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एका अपघाताचा विचित्र प्रसंग शेअर करण्यात आलाय. हा चित्तथरारक व्हिडीओ पाहून मनात भीतीने काहूर माजल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही क्षणी अचानक एखादा प्रसंग कसा ओढावतो, त्याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून येतोय.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, सुरुवातीला एक माणुस पोलादी रॉडने भरलेल्या कंटेनरच्या बाजूला उभा असतो. अचानक काम करत असताना त्या कंटेनरमधील एक खांब त्या व्यक्तीच्या अंगावर कोसळतो. ही भयानक दृश्ये पाहून अंगावर काटाच उभा राहतो.
एक्सवर हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत खूप जणांनी शेअर केला आहे. शिवाय या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देखील येत आहेत.
पाहा व्हिडीओ -
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) January 3, 2024