जिगरबाज दोस्त! मित्राला वाचविण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, Video पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 13:35 IST2021-03-21T13:33:44+5:302021-03-21T13:35:23+5:30
सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होतंच असतं की जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय की जो पाहून नेटिझन्स हैराण होत आहेत.

जिगरबाज दोस्त! मित्राला वाचविण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, Video पाहून व्हाल हैराण
सोशल मीडियात दररोज काही ना काही व्हायरल होतंच असतं की जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय की जो पाहून नेटिझन्स हैराण होत आहेत. केरळच्या वाडकर येथील एक भनायक व्हिडिओ समोर आला आहे.
एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीत उभा असलेला व्यक्ती चक्कर येऊन खाली पडताना या व्हिडिओमध्ये दिसून येतो. पण इतक्यात बाजूला उभा असलेला त्याचा मित्र प्रसंगावधान दाखवून इमारतीवरुन खाली पडणाऱ्या आपल्या मित्राला धरतो. त्यानंतर तात्काळ इतर जण तिथं धावत येतात आणि भोवळ येऊन खाली पडणाऱ्या व्यक्तीला वर खेचून त्याचा जीव वाचवतात.
भोवळ आलेल्या व्यक्तीचं नाव बिनु असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला अचानक भोवळ आल्यानं त्याचा तोल गेला आणि तो गच्चीवरुन खाली पडणार होता इतक्यात त्याचा मित्र बाबूराज यानं त्याला वाचवलं. बाबूराजनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बिनु याचे प्राण वाचले. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून बाबूराज याच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. मित्र असावा तर असा अशा कमेंट्सचा पाऊस या व्हिडिओवर होत आहे.
पाहा या घटनेचा व्हिडिओ...
😱😱😱😱😱 pic.twitter.com/9GPTce1xnt
— Anu Satheesh 🇮🇳 (@AnuSatheesh5) March 19, 2021