रिअल हिरो! चालत्या बाईकवरून उडी घेत बाईकस्वारानं चिमुकल्याला वाचवलं; पाहा व्हिडीओ

By Manali.bagul | Updated: September 22, 2020 13:48 IST2020-09-22T13:42:37+5:302020-09-22T13:48:24+5:30

या बाईकस्वारानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे या चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे.

Man saves baby on stroller video goes viral | रिअल हिरो! चालत्या बाईकवरून उडी घेत बाईकस्वारानं चिमुकल्याला वाचवलं; पाहा व्हिडीओ

रिअल हिरो! चालत्या बाईकवरून उडी घेत बाईकस्वारानं चिमुकल्याला वाचवलं; पाहा व्हिडीओ

आजकाल सीसीटीव्ही कॅमेरात अनेक दृश्य कैद होतात. या घटनांमुळे माणसं सावध होतात. तर अनेक घटनांमधून शिकायलाही मिळतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. एका बाईकस्वारानं आपल्या जीवाशी खेळून चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. सिने निर्माता निला मधाब पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, प्रचंड वेगाने एका लहान मुलाचं वॉकर बाईक समोरून गेले. त्याचवेळी बाईकस्वार त्या ठिकाणी पोहोचतो. लहान मुलाचा वॉकर वेगाने पुढे सरकताना पाहून चालत्या बाईकवरून उडी घेतो आणि धावत जात त्या लहान बाळाचं पुढे जाणारं वॉकर थांबवतो.  लगेचच या बाळासोबत असलेली महिला धावत येते आणि त्या मुलाला उचलून घेते. या सगळ्यात बाईक स्वाराची बाईक आणि खांद्यावरील बॅग रस्त्यात पडते. या बाईकस्वारानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे या चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे.

सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  आतापर्यंत १ लाख ८९ हजार व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. २६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.  या व्हिडीओमधील बाईक स्वारावर सोशल मीडीया युजर्स कौतुकाचा वर्षाव  करत आहेत. 

हे पण वाचा-

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

Web Title: Man saves baby on stroller video goes viral