कोब्रा सापाला तोंडाने श्वास देऊन वाचवण्याचा प्रयत्न, थरारक Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:37 IST2021-06-02T17:33:58+5:302021-06-02T17:37:56+5:30

या व्हिडीओत एक तरुण सापाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. या तरुणाने चक्क विषारी कोब्राला (Cobra Snake)आपल्या तोंडाने श्वास दिला आहे (Man give breath to cobra by his mouth). 

Man saved cobra snake by breathing his mouth shocking viral video from chattisgarh | कोब्रा सापाला तोंडाने श्वास देऊन वाचवण्याचा प्रयत्न, थरारक Video Viral

कोब्रा सापाला तोंडाने श्वास देऊन वाचवण्याचा प्रयत्न, थरारक Video Viral

सापाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यात कोब्रा सापांना पाणी पाजतानाचे काही लोकांचे व्हिडीओही चांगलेच गाजले. तसेच सर्ममित्रांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात एक सापाचा एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक तरुण सापाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. या तरुणाने चक्क विषारी कोब्राला (Cobra Snake)आपल्या तोंडाने श्वास दिला आहे (Man give breath to cobra by his mouth). 

एका विषारी कोब्राला मृत्यूच्या (Cobra rescue video) दारातून परत आणण्यासाठी तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याचं यात बघायला मिळतं. कदाचित असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल. त्यामुळेच हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (हे पण बघा : VIDEO : रस्त्याच्या मधोमध आराम करत असतो वाघ, इतक्यात मागून येतो हत्ती; बघा पुढे काय होतं...)

हा व्हिडीओ छत्तीसगढच्या बस्तरमधील आहे. एका घरात हा कोब्रा घुसला होता. त्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्रांची टीम याठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी सापाला घरातून बाहेर काढलं. जवळपास ८ ते १० फूट लांब हा साप पाहून सर्वांनाच धडकी भरली होती. पण साप काहीच हालचाल करत नव्हता. (हे पण बघा : चुलीवर भाकरी करणाऱ्या सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल, का ते तुम्ही बघा...)

साप श्वास घेऊ शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता या सापाचा जीव वाचण्यासाठी धडपड सुरू केली. त्या सापाच्या तोंडात त्याने एक छोटासा पाइप टाकून त्याला श्वास देण्याचा प्रयत्न केला. सापाला तोंडाजवळ धरून त्याचं तोंड उघडून तो पाइपने सापाला श्वास देतो आहे.
 

Read in English

Web Title: Man saved cobra snake by breathing his mouth shocking viral video from chattisgarh