सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना राग अनावर झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात दूध नदीत ओतून देताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी तो व्यक्ती दूध नदीत ओतत होता, त्याच वेळी दोन लहान मुली भांडी घेऊन तिथे पोहोचतात. त्यांना दूध हवं होतं, पण विकत घ्यायला पैसे नसल्यामुळेच त्या तिथे दूध मागायला गेल्या असाव्यात. मात्र तरीही त्या व्यक्तीचं मन पाझरलं नाही आणि त्याने संपूर्ण दूध नदीत ओतून दिलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुधाचा कॅन थेट नदीत रिकामा करत आहे. तो दूध ओतत असतानाच काही मुली तिथे भांडी घेऊन येतात. त्या व्यक्तीने दूध वाया न घालवता थोडं दूध आपल्याला द्यावं, अशी आशा त्या मुलींना होती. मात्र तसं घडलं नाही. अखेर ती मुलं उदास होऊन तिथून निघून गेली. त्या व्यक्तीचं हे वागणंच लोकांच्या मनाला लागलं आहे. "जर एखादा गरजू समोर उभा राहून तुमच्याकडे काही मागत असेल, तर ते फेकून देण्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा ते दूध त्या मुलांना द्यायला हवं होतं" अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वरहा व्हिडीओ @AnilYadavmedia1 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या व्यक्तीने २० लीटर दूध विनाकारण नदीत वाहून दिलं, पण मुलांना दिलं नाही. यामुळे भारताचं खूप नुकसान झालं आहे.' अवघ्या १५ सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटलं की, "याची कोणतीही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही," तर दुसऱ्याने लिहिलं, "अत्यंत दुःखद गोष्ट आहे, अशा कुप्रथा पाळताना भारतीयांना लाज वाटली पाहिजे." त्याचप्रमाणे एका युजरने लिहिलं, "देवा, भारतातील तरुणांना हे काय झालं आहे?", तर दुसऱ्या एकाने सुनावलं की, "खरं पुण्य तेव्हाच मिळतं जेव्हा आपण गरजू लोकांची मदत करतो."
Web Summary : A viral video shows a man pouring milk into a river, refusing to give it to needy girls who approached him. This act sparked outrage on social media, with users condemning the man's insensitivity and lack of compassion.
Web Summary : एक वायरल वीडियो में एक आदमी नदी में दूध डाल रहा है, ज़रूरतमंद लड़कियों को देने से इनकार कर रहा है। इस हरकत ने सोशल मीडिया पर आक्रोश पैदा कर दिया, यूजर्स ने आदमी की असंवेदनशीलता और दया की कमी की निंदा की।