याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 15:59 IST2021-03-06T15:50:05+5:302021-03-06T15:59:18+5:30
Man made a rope made of old saree piece : एका माणसानं जुन्या साडीचा वापर करून काही मिनिटात दोरी बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ
लोक जुन्या साडीचा वाापर करून काय काय बनवू शकतात हे काही वेगळं सांगायला नको. नवनवीन कुर्ते, फेट्यांपासून पार गोधड्यांपर्यंत नवनवीन गोष्टी साडीपासून तयार करता येऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका माणसानं जुन्या साडीचा वापर करून काही मिनिटात दोरी बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
India you never fail to amaze me with your spirit of innovation - and making a go of “what is”! ❤️
— अद्वैता काला #StayHome 😷 (@AdvaitaKala) March 5, 2021
How to make a rope with an old saree. pic.twitter.com/JO4dFnYldy
हा व्हिडिओ लेखक अद्वैत कला यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारत आपल्या नाविन्यपूर्ण - आणि ''what" या भावनेने मला आश्चर्यचकित करण्यास कधीही अपयशी ठरत नाही! जुन्या साडीतून दोरी कशी बनवायची हे पाहा. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की या लोकांनी साडीचे बरेच लांब तुकडे केले आहेत. त्यानंतर तो दुचाकीवरील मशीनमध्ये अडकवला. मग आपण एक माणूस मशीन हँडल चालवतो आणि काही मिनिटांत एक मजबूत दोरखंड कसा तयार करतो. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत ३१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. १ मिनिटं ५३ सेकेदांच्या या व्हिडीओनं लोकांना वेड लावलं आहे. कारण आपण पाहतो घरोघरी कपडे वाळत घालण्यासाठी अशाच दोऱ्यांचा वापर केला जातो. जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...