थरारक! अंधारात डोंगराखालील नदीत उडी मारण्याचा व्हिडीओ, बघून डोकं चक्रावून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:58 IST2024-11-21T15:44:40+5:302024-11-21T15:58:23+5:30

Viral Video : यात एका व्यक्तीने असा काही कारनामा केला की, बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

Man jumped into deep under ground water video goes viral | थरारक! अंधारात डोंगराखालील नदीत उडी मारण्याचा व्हिडीओ, बघून डोकं चक्रावून जाईल!

थरारक! अंधारात डोंगराखालील नदीत उडी मारण्याचा व्हिडीओ, बघून डोकं चक्रावून जाईल!

Viral Video : काही लोकांना सतत काहीतरी रोमांचक किंवा थरारक करण्याची आवड असते. ते कशालाही न घाबरता अनेक गोष्टी करून दाखवतात. पण त्यांचे कारनामे बघून लोकांचं मात्र डोकं चक्रावून जातं. सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीने असा काही कारनामा केला की, बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीने न घाबरता डोंगरांखाली असलेल्या एका खोल नदीत बिनधास्त उडी मारली. लोक हा व्हिडीओ घाबरले, पण त्याने पाण्यात पडल्यावर आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ पाहून कुणीही म्हणेल की, एकतर ही व्यक्ती खूप जिगरबाज आहे नाही तर वेडी तरी आहे. 

डोंगरात मोठाले दगड दिसत आहे. सोबतच इथे काळोखही आहे. एका उंची जागेवरून त्याने खाली खोल असलेल्या नदीत उडी मारली. तर एक दुसरी व्यक्ती त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंट jeremynicollin वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ६ नोव्हेंबरला पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडिओला १७.४ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहेत. तसेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याचं कौतुक केलं तर काही याला मूर्खपणा म्हणाले.
 

Web Title: Man jumped into deep under ground water video goes viral