कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 16:49 IST2021-02-04T16:35:37+5:302021-02-04T16:49:44+5:30

Trending Viral Video in Marathi : कुत्र्याच्या भीतीनं एक माणूस खूप कडेकडेनं जात आहे. त्यानंतर ते काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Man fear with dog while passing owner done this ips share hilarious video goes viral | कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही खूप हसायला  येईल. अनेकजण कारण नसतानासुद्धा कुत्र्याला घाबरतात. कुत्रा आजूबाजूला असेल किंवा आपल्या दिशेने येतोय असं वाटलं तरी काही लोकांचा भीतीनं थरकाप उडतो. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्र्याच्या भीतीनं एक माणूस खूप कडेकडेनं जात आहे. त्यानंतर जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

कुत्र्याच्या मालकानं अशी काही मस्करी केली आहे. जी पाहून  नेटकरीसुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एक माणूस रस्त्यावरुन जात होता, तर दुसरी व्यक्ती कुत्र्यासोबत जात होती. समोरून येणारा कुत्रा पाहून ती व्यक्ती घाबरते आणि भिंतीला चिकटून पटापट चालण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच कुत्र्याचा मालक मागचा पाय पकडतो. त्या व्यक्तीला असे वाटते की कुत्र्याने त्याला मागून पकडले आहे ती हवेत उडी मारते. कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

हा व्हिडिओ 3 फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले असून  ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. थरारक! बसनं मागून धडक देताच २ जण ट्रॅक्टरमधून खाली पडले; अन् मग घडलं असं काही; पाहा व्हिडीओ

Web Title: Man fear with dog while passing owner done this ips share hilarious video goes viral