शेकडो मगरींनी भरलेल्या नदीतून चालवली नाव; पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:06 IST2023-06-02T15:04:11+5:302023-06-02T15:06:56+5:30

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Man drove boat through a river filled with hundreds of crocodiles; What happened next? Watch the shocking video | शेकडो मगरींनी भरलेल्या नदीतून चालवली नाव; पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

शेकडो मगरींनी भरलेल्या नदीतून चालवली नाव; पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर, तुम्हाला हसवणारे, आनंदी करणारे असतात, तर काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे, थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ मगरींचा(Crocodiles) आहे. 

ट्विटर यूजर ऑडली टेरिफायिंग (Oddly Terrifying) ने हा मगरींचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती छोट्या बोटीवर बसून नदीतून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ही नदी मगरींनी भरलेली आहे. हा व्यक्ती मगरींना न भीता अथिशय आरामात त्यांच्यातून बोट चालवतो. उलट त्या मगरीच त्या व्यक्तीला घाबरून पळून जाताना दिसत आहेत. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, याला 2 लाखांपेक्षा जास्त व्हू मिळाले आहेत. शिवाय, यावर अनेकजण विविध प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने कमेंट केली की, मला कोणी लाखो रुपये दिले तरी मी या नदीत जाणार नाही. दुसऱ्याने लिहिले की, तो व्यक्ती आरामात बसलेल्या मगरींना त्रास देतोय.

Web Title: Man drove boat through a river filled with hundreds of crocodiles; What happened next? Watch the shocking video