जिममध्ये नको ते कर्तब दाखवणे पडले महागात, पुश अप्स करताना जाणार होता जीव, की इतक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:42 IST2022-01-13T15:39:40+5:302022-01-13T15:42:41+5:30
काही तरुण तर केवळ युवतींना इम्प्रेस करण्यासाठी आणि स्टाईल मारण्यासाठीच जिममध्ये जातात. मात्र, कधीकधी स्टाईलच्या नादात त्यांच्यासोबत भलतंच काहीतरी घडतं. सध्या एका अशाच तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Exercise Viral Video) होत आहे.

जिममध्ये नको ते कर्तब दाखवणे पडले महागात, पुश अप्स करताना जाणार होता जीव, की इतक्यात...
आजकाल स्वतःला फीट ठेवण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा ट्रेंड भरपूर वाढला आहे. काही लोक याठिकाणचे नियम अगदी चांगल्या पद्धतीने फॉलो करतात, तर काही लोक मात्र इथे केवळ दिखावा करण्यासाठी जातात. यातील काही तरुण तर केवळ युवतींना इम्प्रेस करण्यासाठी आणि स्टाईल मारण्यासाठीच जिममध्ये जातात. मात्र, कधीकधी स्टाईलच्या नादात त्यांच्यासोबत भलतंच काहीतरी घडतं. सध्या एका अशाच तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Exercise Viral Video) होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती जिममध्ये अगदी वेगात पुल अप्स करत आहे आणि यादरम्यान आपल्या बाजूलाच उभा असलेल्या महिला ट्रेनरकडे पाहात आहे. तो अतिशय वेगात पुशअप्स मारतो. मात्र काहीच वेळात त्याचा हात सुटतो आणि तो धाडकन तोंडावर आपटतो. हा व्यक्ती खाली कोसळताच महिला लगेचच त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागते. मात्र, या तरुणाला भरपूर मार लागला असल्याचं दिसतं.
व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबतची माहिती मिळालेली नाही. मात्र या व्हिडिओवर अनेकजण निरनिराळ्या कमेंट करत आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे, की तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. असे घातक स्टंट आणि असे स्टंट करणारे लोक, यांच्यापासून नेहमी दूर राहायला हवं. एका यूजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं, खरंच स्टंटबाजीच्या नादात लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, हा जीवघेणा स्टंट होता.