नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:00 IST2021-08-10T13:34:06+5:302021-08-10T14:00:19+5:30
डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय.

नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार
सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. यावर रोज वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. त्यातही डान्सचे व्हिडीओ (dance video) तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय. (man dancing in crazy way funny video went viral on social media)
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक समारंभ दिसत आहे. सगळे आनंदात असल्यामुळे ढोल आणि ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला आहे. तेव्हाच एक माणून नाचायला सुरुवात करतो. तो सगळं काही विसरून बेभान होऊन डान्स करतोय. नाचत असताना हा माणसू ढोल वाजवणाऱ्या माणसाच्या पायात लोळण घेऊ लागतो. बेभान झालेल्या माणसाची ही डान्स करण्याची पद्धत ढोल वाजवणाऱ्या माणसाला फारशी पसंत पडलेली दिसत नाही. तो ढोल वाजवतानाच खाली लोळून डान्स करणाऱ्या माणसाला ढोल वाजवण्याच्या काठीने बडवायला सुरुवात करतो. मार बसल्यामुळे डान्समध्ये बेभान झालेला हा माणूस लगेच शुद्धीवर आला आणि त्याने तिथून पळून काढला.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर (instagram) pollywood.attitude या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पोट धरुन हसत आहेत.