बोंबला! घरात झाडू मारता मारता थेट जंगलात पोहोचला; पण कसा, पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:04 IST2020-08-18T19:46:53+5:302020-08-18T20:04:49+5:30
अनेकांनी पहिल्यांचा इतका वेळ घरात घालवल्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यांना आले.

बोंबला! घरात झाडू मारता मारता थेट जंगलात पोहोचला; पण कसा, पाहा व्हायरल व्हिडीओ
कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कहर केला आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये अनेकांना घरकामाचा पुरेपूर आनंद घेतला तर काहींना डिजिटल माध्यामातून क्सासेस, बेबिनार यांचा आनंद घेतला. अनेकांनी पहिल्यांचा इतका वेळ घरात घालवल्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यांना आले. अशाच एका तरुणाचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Ridiculously brilliant 🙌🏼 pic.twitter.com/tsPInyX3XI
— Venkatasubramanian (@venkattcv) August 13, 2020
तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये एका तरूणानं झाडू मारायला सुरूवात केली आहे. या तरुणानं आपल्या खोलीतून साफसफाई करायला सुरुवात केली होती आणि सफाई करता करता जंगलात पोहोचल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया युजर्सनीं या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. व्यंकटेश सुब्रमण्यम नावाच्या ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आतापर्यंत ट्विटरवर हा व्हिडीओ १० लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ १३ सेंकदाचा आहे. या व्हिडीओत तरुण एका खोलीपासून झाडू मारायला सुरुवात करतो आधी खोली मग जीना मग घर मग त्याला सगळीकडे कचरा दिसायला लागतो आणि हा कचरा उचलताना तरुण जंगलापर्यंत पोहोचत असल्याचं तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसून येईल. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा हा व्हिडीओ आहे.
हे पण वाचा-
याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान
कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!
सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल