VIDEO : Biker ने वेगाने डोंगरावर चढवली बाइक, वर जाऊन झाला खतरनाक अपघात आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 15:15 IST2021-04-15T15:14:03+5:302021-04-15T15:15:56+5:30
सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुरूवातीला बघताना आपली उत्सुकता वाढवतो.

VIDEO : Biker ने वेगाने डोंगरावर चढवली बाइक, वर जाऊन झाला खतरनाक अपघात आणि....
Dangerous Accident Viral Video : हिंमत आणि इच्छाशक्ती असेल तर हवं ते मिळवता येतं. हव्या त्या ठिकाणी पोहोचता येतं. एखादी गोष्ट सहज मिळत नाही. तेव्हा वेगवेगळे प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट मिळते. सोशल मीडियावर असलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये या गोष्टी बघायला मिळतात. अनेकजण हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचतात. पण तिथे पोहोचल्यावरही त्यांना अपयश मिळतं तेव्हा ते फार निराश होतात.
सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुरूवातीला बघताना आपली उत्सुकता वाढवतो. ती व्यक्ती डोंगराच्या टोकावर पोहोचावी असं आपल्यालाही वाटतं. खरंतर होतंही तसं. पण थोडक्यात सगळं चुकतं. तसं डोंगरावर पायी चढून जाणं अवघड असतं. पण काही लोक थरारक कामे करतात. त्यातीलच हे. ही व्यक्ती बाइकने डोंगरावर चढत आहे. पण त्याच्यासोबत एक भयंकर अपघात होतो. (हे पण बघा : कार पार्क करताना घामाघूम झाली तरूणी, शेवटी झालं असं काही - व्हिडीओने घातला धुमाकूळ!)
बाइक घेऊन जेव्हा ती व्यक्ती वर चढत असते तेव्हा आधी असं वाटतं की, तो सहजपणे वर चढेल. पण तसं काही होत नाही. वर पोहोचण्याच्या काही अंतरावरून बाइक स्लीप होते आणि बाइकर खाली पडू लागतो. सुदैवाने बाइकर वर स्वत:चा जीव वाचवतो. पण त्याची बाइक खाली पडते. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून बिग बुल बाइक नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.