घड्याळाने झाली पतीच्या अनैतिक संबंधाची पोलखोल, विद्यार्थीनीसोबत सुरू होतं लफडं; पत्नी रडून रडून बेहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:56 IST2026-03-03T14:46:19+5:302026-03-03T14:56:07+5:30

Viral News : नूरिनची नजर स्मार्टवॉचवर पडली आणि तिने मेसेज पाहिला तर तिच्या पायाखालची जमिनच सरकली.

Malaysian influencer Nurin Lofa discovers husband cheating with student through smartwatch messages | घड्याळाने झाली पतीच्या अनैतिक संबंधाची पोलखोल, विद्यार्थीनीसोबत सुरू होतं लफडं; पत्नी रडून रडून बेहाल

घड्याळाने झाली पतीच्या अनैतिक संबंधाची पोलखोल, विद्यार्थीनीसोबत सुरू होतं लफडं; पत्नी रडून रडून बेहाल

Viral News : हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, जगात काही लपवून ठेवणं अवघड झालं आहे. लोकांचे सगळे रहस्य सहजपणे उघड होतात. मलेशियातील २१ वर्षीय इन्फ्लुएन्सर नूरिन लोफासोबत असंच झालं. ज्या पतीला तिने अडचणीच्या काळात साथ दिली तोच आता तिचा विश्वासघात करत आहे. याचा खुलासा त्याच्याच स्मार्टवॉचने झाला. एक दिवस पतीला मेसेज आला तर त्याचं नोटिफिकेशन स्मार्टवॉचर चमकलं. नूरिनची नजर त्यावर पडली आणि तिने मेसेज पाहिला तर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. स्मार्टवॉचवर पती आणि एका दुसऱ्या महिलेचे आक्षेपार्ह आणि रोमँटिक मेसेज दिसले.

नूरिनने सोशल मिडियावर आपलं दु:खं व्यक्त करत सांगितलं की, ती महिला दुसरी कुणी नाही तर एक विद्यार्थीनी आहे. नूरिनसाठी ही घटना मोठा धक्का होती. कारण तिने पतीसाठी सगळ्यांसोबत भांडण केलं होतं. जेव्हा पतीकडे ठोस नोकरी नव्हती आणि लोक त्याला बेकार म्हणत होते, तेव्हा नूरिन त्याची ढाल बनून समोर ठामपणे उभी होती.

नूरिनने तेव्हा सांगितलं होतं की, तिचा पती एक फूड डिलिव्हरी रायडर आहे आणि तो त्याच्या मेहनतीचं खातो. पण त्याच पतीने आता नूरिनचा विश्वास तोडला. नूरिनने भावूक होत सांगितलं की, तिने पतीवर प्रेमात आंधळी होऊन विश्वास ठेवला. त्या बदल्यात तिला फक्त खोटं आणि दगा मिळाला. सोशल मिडियावर नूरिनचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात तिने त्या महिलेला थेट आव्हान दिलं आहे. ती म्हणाली की, जर या अफेअरबाबत तिच्या आई-वडिलांना समजलं तर तिला कसं वाटेल.

नूरिनने स्पष्टपणे सांगितलं की, ती आता गप्प बसणार नाही. कारण तिच्यासोबत तिचं छोटं बाळही आहे. ती म्हणाली की, ती आता हा अपमान सहन करणार नाही. पण नंतर पतीच्या दबावात येऊन तिने काही पोस्ट नंतर डिलिट केल्या. पण आता हे प्रकरण शांत होण्याऐवजी कोर्टाच्या दारात गेलं आहे. 

नूरिन सांगते की, घरातील वातावरण थोडं शांत झालं आहे. पण त्या महिलेबाबत तिच्या मनात जो द्वेष आहे, त्याची जबाबदारी ती घेणार नाही. दरम्यान नूरिनने आपल्या लहान बाळासाठी एक पोस्ट लिहिली आहे. मुलाचा फोटो शेअर करत तिने माफी मागितली की, तिने त्याच्यासाठी एक चुकीचा बाप निवडला. आता नूरिनने शपथ घेतली आहे की, ती आपल्या मुलासाठी चांगली आणि प्रेम करणारी आई बनेल आणि त्याला वडिलांची कमतरता भासू देणार नाही.

Web Title: Malaysian influencer Nurin Lofa discovers husband cheating with student through smartwatch messages