Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:17 IST2019-11-01T16:16:54+5:302019-11-01T16:17:40+5:30
पंजाबमधील लुधियानात रस्त्यावरून एक विचित्र गाडी फिरताना दिसली. ज्यांनीही गाडी फिरताना पाहिली ते सर्वजण हैराण झाले. एका व्यक्तीने आपली बाईकचं रूपांतर गाडीत केलं आहे.

Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड'
पंजाबमधील लुधियानात रस्त्यावरून एक विचित्र गाडी फिरताना दिसली. ज्यांनीही गाडी फिरताना पाहिली ते सर्वजण हैराण झाले. एका व्यक्तीने आपली बाईकचं रूपांतर गाडीत केलं आहे. ट्विटर यूजर @desimojito ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या अवलियाने आपल्या गाडीला जिपचा लूक दिला आहे. त्याची गाडी पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, गाडीच्या पुढच्या बाजूला दोन सीट्स आहेत. त्या सीट्सवर दोघेजण बसले आहेत. हा व्हिडीओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. त्याने पुढे जाऊन गाडी थांबवली आणि त्या व्यक्तीला विचारलं. त्यावेळी त्याने सांगितलं की, ही गाडी त्याने स्वतः तयार केली आहे. त्याने हेदेखील सांगितलं की, अजून ती गाडी पूर्ण तयार होणं बाकी आहे.
India has got talent. Made in Ludhiana pic.twitter.com/wsYOI7VhHs
— Le desi mojito 😍 (@desimojito) October 31, 2019
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत 50 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 5 हजार लाइक्स आणि 2 हजार रि-ट्विट्स मिळाले आहेत. ट्विटर यूजर्स या व्यक्तीचं फार कौतुक करत आहेत.
एका यूजरने लिहिलं आहे की, 'या दोघांनी हेल्मेट घालणं आवश्यक आहे किंवा सीटबेल्ट?' दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, 'अजूनही आपल्या देशात खरं टॅलेन्ट जिवंत आहे. एवढंच नाहीतर अनेकांनी हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना टॅग केला आहे. ते ट्विटरवर फार अपडेट राहतात आणि त्यांचे रिअॅक्शन्सही नेटकऱ्यांना फार आवडतात.